‘ते’ ट्विटर खाते माझे नाहीच- प्रकाश आंबेडकर

मुंबई – भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या काँग्रेस बद्दल केलेल्या ट्विटची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच रंगू लागली आहे. “काँग्रेसला या पुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण कॉंग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे”. असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांच्या ट्विटर आकाउंटवरून करण्यात आलं होत.

तर, दुसरीकडे ‘ते’ ट्विटर अकाउंट आणि ट्विट माझे नसल्याचा दावा प्रकाश आंबेडर यांनी केला आहे. सध्या काँग्रेससोबत समसमान पातळी चर्चा याबाबत काहीच भूमिका नाही. वंचित बहुजन आघाडीची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्यात चर्चा करुन पुढील निर्णय घेतले जातील, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.

 

https://twitter.com/Prksh_Ambedkar/status/1132492261659271168

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)