या दोन स्टार्सचे बिग बजेट सिनेमे होणार एकाच दिवशी रिलीज; क्लॅशमध्ये कोणाला फटका? कोणाला पसंती? वाचा…

Sikandar Lucifer 2 | ईदच्या मुहूर्तावर बॅालीवूडच्या भाईजानचा सिंकदर सिनेमा रिलीज होणार आहे. सिनेमातील काही गाणी टीझर स्वरुपात रिलीज करण्यात आली आहेत. या गाण्यांना आणि सिनेमाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावर सलमानच्या सिंकदर सिनेमाची जोरदार चर्चा आहे. या सिनेमाच्या निर्मात्यांकडून सिनेमाच्या प्रमोशनची जोरदार तयारी करण्यात येत आहे. सिंकदरची हाईप तयार होत असतानाच आता साउथमधील स्टार कलाकार मोहनलाल याचा ल्युसिफरचा सिक्वीन ईदच्या दिवशी रिलीज करण्यात येणार आहे. यामुळे ईदच्या मुहूर्तावर बॅाक्स अॅाफिसवर या दोन सिनेमांचा बोलबाला असणार आहे.
मोहनलन 5 वर्षांनंतर सुपहिट ठरलेल्या ल्युसिफर सिनेमाचा सीक्वल घेऊन येणार आहे. या सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा नुकतीच करण्यात आली असून दोन्ही सिनेमांची क्लॅश होणार अशी चर्चा होत आहे. मात्र, हिंदीमध्ये सलमानच्या सिंकदरला चांगला प्रतिसाद मिळू शकतो तर दुसरीकडे साउथमध्ये मोहनलाल यांच्या ल्युसिफरला प्रेक्षक पसंती देतील, त्यामुळे जरी हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाले तरी त्याचा या सिनेमांच्या कलेक्शनवर फारसा परिणाम होणार नाही.
सिकंदरमध्ये रश्मिका मंदाना पहिल्यांदाच सलमानसोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. यामुळे ही जोडी पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन ए.आर. मुरुगदास यांनी केले आहे. सिनेमाचे बजेट 200 कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले जाते. हा चित्रपट 30 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. दुसरीकडे, मोहनलनच्या ल्युसिफर बद्दल साउथमध्ये मोठी चर्चा आहे. हा सिनेमा 2019 च्या ब्लॉकबस्टर सिनेमा ल्युसिफर सिक्वेल असणार आहे. हा चित्रपट पृथ्वीराजचा दिग्दर्शकीय पदार्पणाचा पहिलाच सिनेमा असणार आहे. सिनेमात अनेक कलाकारांच्या लक्षवेधी भूमिका असणार आहेत.





