MLA Santosh Bangar : राज्यात एकीकडे अॅापरेशन टायगरची जोरदार चर्चा सुरू असून, दुसरीकडे शिंदेसेनेच्या आमदाराने आपल्याच पक्षातील मंत्र्यांना घरचा आहेर दिल्याने नाराजीच्या चर्चांना उधाण आले आहे. नांदेड येथे शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित आढवा बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांविरोधात जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. “काही मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत.” तसेच डोक्यात हवा गेलेल्या मंत्र्यांना अगोदर घरी बसवा, अशा शब्दांत त्यांनी खडेबोल सुनावले. या बैठकीला खासदार श्रीकांत शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उपस्थित होते. त्यांच्यासमोरच कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी आक्रमक पवित्रा घेतला. MLA Santosh Bangar नेमकं काय घडलं? या बैठकीत आमदार संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांच्या तक्रारी थेट पक्ष नेतृत्वासमोर मांडल्या. निधी वाटपातील अन्याय, कामे न मिळणे आणि त्यासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागणे याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. बांगर यांनी थेट मंत्र्यांवर निशाणा साधत, “मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे. अशा मंत्र्यांना आधी घरी बसवा,” असा घरचा आहेर दिला. तसेच बांगरांनी मंत्री फोन उचलत नसल्याची खदखद व्यक्त केली. MLA Santosh Bangar : “मंत्र्यांच्या डोक्यात हवा गेली आहे, अशा मंत्र्यांना…”; आमदार संतोष बांगरांनी थेट श्रीकांत शिंदेसमोर मंत्र्यांना दिला घरचा आहेर दरम्यान, मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विसंवाद वाढत असल्याचे चित्र आहे. पक्षाने वेळेत यावर तोडगा काढला नाही तर या अंतर्गत कलहाचा फटका संघटनेला बसू शकतो, अशी भीती कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. MLA Santosh Bangar श्रीकांत शिंदे काय म्हणाले? या बैठकीनंतर खासदार श्रीकांत शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांवरही भाष्य केले. “ऑपरेशन टायगर असे काही नाही, हे केवळ माध्यमांनी दिलेले नाव आहे. आमचे एकमेव ध्येय संघटना मजबूत करणे हे आहे. आम्हाला 2029 पर्यंत शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवून अधिक सामर्थ्यवान करायची आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. MLA Santosh Bangar हेही वाचा : Anemia Remedies: जाणून घ्या रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी आयुर्वेदातील 3 सोपे आणि प्रभावी उपाय