जगातील कैद्यांना ठेवण्यासाठी एकापेक्षा जास्त तुरुंग बांधले गेले आहेत. यातील अनेक तुरुंग अत्यंत धोकादायक आहेत, ज्याबद्दल जाणून घेतल्यास तुमचा आत्मा हादरेल. आज आम्ही तुम्हाला जगातील सर्वात धोकादायक कारागृहांबद्दल सांगणार आहोत. हे सर्व परदेशात आहेत आणि कैद्यांसाठी नरकासारखे आहेत. * गीटर्मा कारागृह गीटर्मा तुरुंग पूर्व आफ्रिकेतील रवांडा देशात आहे. या तुरुंगाला ‘पृथ्वीवरील नरक’ म्हणतात. एका रिपोर्टनुसार, या तुरुंगातील कैद्यांना सांगण्यात आले आहे की, येथील कैदी हे मानव नसून प्राणी आहेत. त्यामुळे त्यांच्यासोबत काहीही केले जाऊ शकते. या कारागृहात कैद्यांना अमानुष पद्धतीने मारहाण केली जाते. याशिवाय कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारीही होते, ज्यामध्ये अनेक वेळा त्यांना प्राणही गमवावे लागतात. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे येथील कैदी नरभक्षक असल्याचेही सांगितले जाते. अनेकवेळा त्यांनी इतर कैद्यांना ठार मारले आहे आणि चक्क मांस खाल्ले आहे. * ताडेमोर लष्करी तुरुंग सिरीयात असलेले ताडेमोर लष्करी तुरुंग अत्यंत धोकादायक मानले जात होते, परंतु आता दहशतवादी संघटना ISIS ने ते उद्ध्वस्त केले आहे. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलशी केलेल्या संभाषणात एका कैद्याने सांगितले की, रक्षक तुरुंगात असंख्य कैद्यांना मारहाण करत असत. * ला सबेनेट तुरुंग व्हेनेझुएलातील ला सबेनेट तुरुंग जगात अत्यंत कुप्रसिद्ध आहे. येथील पोलिस कैद्यांकडून पैसे घेतात आणि नंतर त्यांना झोपण्यासाठी खोल्या आणि बेड देत असल्याचे सांगितले जाते. या कारागृहात मोठ्या प्रमाणात कैद्यांना ठेवण्यात आले आहे. 2013 मध्ये हे कारागृह बंद करण्यात आले तेव्हा 3500 कैदी राहत होते तर केवळ 700 कैद्यांना राहण्याची सोय होती. या कैद्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश होता. येथून टोळीयुद्धाच्या बातम्याही येत होत्या. 2013 मध्ये झालेल्या हिंसाचारात एकूण 69 लोकांचा मृत्यू झाला होता. * कॉन्सन्ट्रेशन कॅम्प उत्तर कोरियामध्ये असलेल्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पबाबत कोणाकडे फारशी माहिती नाही, पण त्यावर नेहमीच शंका घेतली जाते. 2012 साली कॅम्प बंद झाल्याचे सांगण्यात येते. पण बरेच लोक याला फक्त अफवा म्हणतात. रिपोर्ट्सनुसार, या कॅम्पमध्ये 50 हजारांहून अधिक कैदी ठेवण्यात आले होते. यातील बहुसंख्य हे हुकूमशहाविरुद्ध आवाज उठवणारे लोक होते. इथे एका छोट्याशा चुकीसाठीही संपूर्ण कुटुंबाला कोंडून घेतले जाते. यानंतर तो जिवंत आहे की मेला हेही कळू शकत नाही.