Devendra Fadnavis :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणार असल्याच्या चर्चा कोणत्या कोणत्या कारणांमुळे सतत होतच असतात. अनेकदा स्वतः फडणवीसांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आता राज्याच्या राजकारणात देवेंद्र फडणवीसांच्या केलेल्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. पुण्यात लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते ‘लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस’चे भूमिपूजन गुरुवारी करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती दर्शवली होती. या कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी त्यावेळेस मी प्रदेशाध्यक्ष होतो. मी आता मुख्यमंत्री झालो आहे, त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आहे, त्यामुळं आता पेंडिंग काही नाही, असे वक्तव्य केले आहे. नेमंक काय घडलं? या कार्यक्रमात लता मंगेशकर मेडिकल फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉ. धनजंय केळकर यांनी लता-आशा मंगेशकर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या उभारणीचे टप्पे, सुविधा आणि फाउंडेशनच्या कार्याची माहिती दिली. त्यावेळी केळकर यांनी रुग्णालयात आलेले प्रमुख पाहुणे आणि घडणाऱ्या योगायोगाचा संदर्भ देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नावही देशाच्या राजकारणात, दिल्लीत गाजणार, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. केळकर म्हणाले जो इथ येतो तो मोठा होतो, ज्यावेळेस इथं आलो होते त्यावेळेस मी प्रदेशाध्यक्ष होतो. मी आता मुख्यमंत्री झालो आहे, त्यांचा आशीर्वाद मला मिळाला आहे, त्यामुळं आता पेंडिंग काही नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. …तर ठरलेल्या वेळी कार्यक्रम झालाच पाहिजे अचानक चार दिवसापूर्वी आशाताईंचं दुर्दैवी निधन झालं, त्यामुळे कार्यक्रम रद्द होईल असे वाटले, पण मंगेशकर कुटुंबिय आणि ट्रस्ट यांनी विचार केला की, आशाताई हे त्यांचं आयुष्य उत्सव आहे असं जगल्या. माझ्या मरणाचं दुःख करु नये असं सांगणाऱ्या आशाताई होत्या. अशा परिस्थितीमध्ये जर अशाताईंना खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर ठरलेल्या दिवशी आणि त्याचवेळी कार्यक्रम झाला पाहिजे हा निर्णय घेतल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मंजुषा नागपुरे, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, फाउंडेशनचे अध्यक्ष पंडित हृदयनाथ मंगेशकर, विश्वस्त उषा मंगेशकर, आनंद भोसले, आदिनाथ मंगेशकर, लता मंगेशकर फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर आदी उपस्थित होते. हेही वाचा : Kalyani Priyadarshan: कल्याणी प्रियदर्शन-प्रणव मोहनलालच्या लग्नाच्या चर्चा फोल; आईनेच सांगितलं खरं सत्य!