नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेला बायोपिक ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट उद्या म्हणजेच ११ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र आज निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग होऊ शकतो असे कारण देत निवडणुकांच्या काळात हा चित्रपट प्रदर्शित करू नये असा आदेश दिला आहे.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याची मागणी करणारी विरोधकांची याचिकी फेटाळली होती. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा असे निर्देश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आज निवडणूक आयोगाने या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबत निर्णय घेतला असून लोकसभा निवडणुकांच्या पार्श्ववभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असणारा ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा बायोपिक प्रदर्शित झाल्यास त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो. आदर्श आचारसंहितेचा भंग पावण्याची शक्यता असल्याने हा चित्रपट प्रदर्शित करू नये. असे आदेश दिले आहेत.
निवडून आयोगाने ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटासह एनटीआर लक्ष्मी आणि उदयमा सिन्हम या चित्रपटांवर देखील तात्पुरती बंदी घातली आहे.
Election Commission on complaints against movies NTR Laxmi, PM Narendra Modi & Udyama Simham: "These have potential to affect level playing field which is in consonance with Model Code of Conduct" & "shouldn't be displayed in electronic media including cinematograph during MCC" pic.twitter.com/3jRiVDyeE2
— ANI (@ANI) April 10, 2019