सोमेश्वरनगर, (वार्ताहर)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहकार्याने बारामती तालुक्यात कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली आहेत. बारामतीकरांच्या मनात त्यांच्याबद्दल प्रेमाची भावना आहे. महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही तळागाळातील सर्वसामान्य महिलांपर्यंत पोहोचलेली योजना आहे. योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य महिलांना आर्थिक पाठबळ मिळाले आहे. महिलांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. या योजनांच्या माध्यमातून मुली उच्चशिक्षित होतील, असा विश्वास खासदार सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला. निंबूत (ता. बारामती) येथे निंबूत ग्रामविकास प्रतिष्ठानच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या लोकनेते अजितदादा पवार सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन आणि बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना गृहोपयोगी संच व सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते शामराव काकडे होते. यावेळी निंबूत ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश काकडे, उद्योजक रामदास काकडे, माजी सभापती प्रमोद काकडे, निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठानच्या संचालिका ॲड. गायत्री भोसले, उद्योजक आर. एन. शिंदे, दिलीप फरांदे, ॲड. गीतांजली ढोणे, विजयकुमार सोरटे, दिलीप फरांदे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक अभिजीत काकडे, लक्ष्मण गोफणे, शिवाजीराजे निंबाळकर, रूपचंद शेंडकर, लाभार्थी महिला उपस्थित होत्या. सुनेत्रा पवार यांनी निंबूत येथे उभारण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाला अजित पवार यांचे नाव दिल्याबद्दल आभार मानले. यावेळी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी मार्गदर्शन केले. स्वप्निल जगताप यांनी योजनेसंदर्भात माहिती दिली. सूत्रसंचालन मदन काकडे यांनी केले. भीमराव बनसोडे यांनी आभार मानले.