इंदौर – कोरोना व्हायरसच्या संकटाने संपूर्ण जग हादरून गेलेलं असताना भारतातही या व्हायरसने शिरकाव केला आहे. असतांना इंदौरमध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आपल्या देशात कोरोनाचा काहीही परिणाम होणार नाही. कारण येथे ३३ करोड देवी-देवता राहतात. त्यांच्या या विधानामुळे सध्या सोशल मीडियावर चांगलीच कैलास विजयवर्गीय यांच्यावर युजर्सद्वारे चांगलीच ट्रोल केले जात आहे. कैलास विजयवर्गीय नेते म्हणाले,’ आमच्या देशात 33 करोड देवी-देवता राहतात, यासाठी येथे कोरोना व्हायसचा कोणताही परिणाम दिसून येणार नाही. यानिमित्त बजरबट्टू संमेलनात हनुमानाची वेशभूषा करणारे माजी आमदार जीतू जिराती यांच्याकडे पहात ते म्हणाले, बजरबट्टू संमेलनमध्ये जिराती यांना कोरोना हनुमान नाव देण्यात आले आहे, ज्यांच्या आशीर्वादाने कोणालाही संसर्ग होणार नाही.’ असेही ते म्हणाले आहे. मात्र सोशल मीडियावर मिम्सच्या माध्यमातून या वक्तव्याची जोरदार खिल्ली उडवली जात आहे.