Nothing Phone : लोकप्रिय टेक ब्रँड Nothing आपला नवीन बजेट स्मार्टफोन ‘Nothing Phone 3a Lite’ येत्या 29 ऑक्टोबर रोजी लॉन्च करणार आहे. कंपनीने ‘X’ (पूर्वीचा ट्विटर) वर याचे डिझाइन टीझर जारी करत या मॉडेलची अधिकृत पुष्टी केली आहे. हा फोन Phone 3a पेक्षा स्वस्त आणि हलका व्हर्जन असेल. यामध्ये कंपनीच्या खास Glyph लाइटिंग सिस्टम चे नवीन आणि छोटं व्हर्जन पाहायला मिळेल. हा स्मार्टफोन Nothing च्या किफायतशीर लाइनअपला अधिक बळकट करणार असून, भारतात याची किंमत अंदाजे ₹20,000 च्या आसपास असू शकते. डिझाइन टीझरनंतर वापरकर्त्यांमध्ये याच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. डिझाइन आणि फीचर टीझर : कंपनीने X वर शेअर केलेल्या एका छोट्या व्हिडिओमध्ये Nothing Phone 3a Lite च्या बॅक पॅनेलची झलक दाखवण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये एक ब्लिंक करणारी LED लाईट दिसते, जी Glyph लाइटिंग सिस्टम ची साधी पण आकर्षक आवृत्ती असल्याचं दिसतं. कंपनीने या फोनसाठी “Light up the everyday” ही टॅगलाइन दिली आहे, ज्यातून स्पष्ट होते की LED फीचर हे या फोनचे खास आकर्षण असेल. स्पेसिफिकेशन्स आणि परफॉर्मन्स : लीक झालेल्या अहवालांनुसार, Nothing Phone 3a Lite मध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट असू शकतो. हा फोन Geekbench वर लिस्ट झाला असून, याचे डिझाइन CMF Phone 2 Pro प्रमाणे असल्याची शक्यता आहे. डिस्प्ले: 6.77-इंच Full HD+ AMOLED रिफ्रेश रेट: 120Hz बॅटरी: 5000mAh रॅम आणि स्टोरेज: किमान 8GB RAM आणि 128GB स्टोरेज वेरिएंट, दरम्यान, ही वैशिष्ट्ये पाहता, हा फोन परफॉर्मन्स आणि बॅटरी बॅकअप या दोन्ही बाबतीत मजबूत ठरू शकतो. भारतातील लॉन्च आणि किंमत : Nothing कंपनीने सांगितले आहे की, Phone 3a Lite चा ग्लोबल लॉन्च 29 ऑक्टोबर रोजी भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6:30 वाजता (IST) होणार आहे. हा फोन Phone 3a आणि CMF सीरीज यांच्यातील मिड-रेंज ब्रिज म्हणून सादर केला जाणार आहे. भारतामध्ये या फोनची किंमत सुमारे ₹20,000 असण्याचा अंदाज असून, हा बजेट सेगमेंटमध्ये एक मजबूत पर्याय ठरेल, अशी अपेक्षा आहे.