हृदयविकाराचा त्रास नव्हता – इंझमाम
Updated On:

लाहोर – पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हक याला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करत अँजिओप्लास्टी करण्यात आली. मात्र, खुद्द इंझमामने आपल्याला हृदयविकाराचा झटका आला नव्हता, असा खुलासा केला आहे.
मला हृदयविकाराचा झटका आला नव्हता, तर पोटाच्या त्रासामुळे मला डॉक्टरांनी अँजिओग्राफी करायला सांगितली होती. अँजिओग्राफी करताना हृदयाला रक्तपुरवठा करणारी एक नस दाबली गेल्याचे लक्षात आल्यावर भविष्यात मोठा त्रास होऊ नये, यासाठीच अँजिओप्लास्टी करून स्टेंट बसवण्यात आली, असे इंझमामने सांगितले आहे.
ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर काही वेळानंतर मला घरी सोडले व आता माझी प्रकृती ठीक आहे, असेही त्याने सांगितले.





