महाराष्ट्रात रोजगार देणारा उद्योजक व्हावा – आमदार अशोक पवार

कोरेगाव भिमा : शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथे एस एस ब्रदर्स या नवीन व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी आमदार अशोक पवार यांनी उपस्थित तरुणांना मार्गदर्शन करताना युवकांनी उद्योगधंदे उभारत, जिद्दीने चालवत इतरांना रोजगार देणारे व्हायला हवे असे सांगितले.
उद्योग एका दिवसात उभे राहत नाही त्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत व्यवसायात झोकून द्यावे लागते तेव्हा व्यवसायात यश मिळते. त्यासाठी सातत्याने कष्ट, त्याग, नियोजन व उत्तम व्यवस्थापन गरजेचे असल्याचे आमदार अशोक पवार यांनी गुंतवणूक आणि विमा सल्लागार साईनाथ साहू व शंभूनाथ साहू यांच्या एसएस ब्रदर्स सर्व्हिसेसच्या उद्घाटन प्रसंगी विचार व्यक्त केले.
यावेळी बाजार समितीचे संचालक दत्ता हरगुडे, पुणे जिल्हा नियोजन समिती माजी सदस्य पंडित दरेकर, सणसवाडीच्या सरपंच रुपाली दगडू दरेकर, उपसरपंच राजेंद्र दरेकर, माजी सरपंच सुवर्णा रामदास दरेकर, माजी सरपंच संगिता नवनाथ हरगुडे, काँग्रेसचे शिरूर तालुकाध्यक्ष वैभव यादव, मनसे पुणे जिल्हाध्यक्ष रामदास दरेकर, माजी उपसरपंच ॲड विजयराज दरेकर, माजी सरपंच युवराज दरेकर, माजी चेअरमन सुहास दरेकर, वसेवाडी शाळेचे मुख्याध्यापक संतोष गोसावी सर, दगडू दरेकर, रामदास दरेकर, माजी चेअरमन कैलास दरेकर, प्रशांत दरेकर, विठ्ठल दरेकर, विकास हरगुडे, अमोल हरगुडे ,उत्तम दरेकर, निलेश दरेकर,शिवाजी हरगुडे, रामदास हरगुडे, प्रदीप म्हेत्रे, राजेंद्र दरेकर, प्रा.अनिल गोटे, पंढरीनाथ गोरडे अशोक करडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.





