Supriya Sule: “राष्ट्रवादी एकच, पक्षावर…”; संभाव्य विलिनीकरणावर सुप्रिया सुळे स्पष्टचं बोलल्या
Supriya Sule : चुकीच्या पद्धतीने तो पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. जर तुम्ही पक्षाचं संविधान पाहिलं तर शरद पवार यांच्यावर अन्याय झाल्याचं दिसून येईल, असे मोठं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.

Supriya Sule on NCP merger : महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा सतत होत असतात. या चर्चेवर दोन्ही बाजूच्या बड्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येतात. मात्र, संभाव्य विलिनीकरण होणार की नाही याबाबत ठोस अशी माहिती अद्याप समोर आलेली नाही. अशातच या चर्चेवर पुन्हा एकदा शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाष्य करत मोठं वक्तव्य केले आहे.
कालपासून अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे आंदोलनाला बसले आहेत. या आंदोलनावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का? या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी मोठं वक्तव्य केले. त्या म्हणाल्या “राष्ट्रवादी एकत्रच आहे. आमचा पक्ष एकत्रच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकच पक्ष आहे. पक्षाचा फाउंडर मेंबर कोण आहे? पक्षाचा फाउंडर प्रेसिडेंट कोण आहे? तर शरद पवार आहेत. चुकीच्या पद्धतीने तो पक्ष त्यांच्याकडून काढून घेण्यात आला. जर तुम्ही पक्षाचं संविधान पाहिलं तर शरद पवार यांच्यावर अन्याय झाल्याचं दिसून येईल, असे मोठं वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.
कोणाची सत्ता परमनंट नसते : सुप्रिया सुळे
पुढे बोलताना त्या म्हणाल्या “हा देश कोणाच्या मन मर्जीने चालत नाही. तो संविधाने चालतो. पक्षाचं काय करायचं? पक्ष कोणाला द्यायचा? पक्षाचं नेतृत्व कोण करेल हे ठरवण्याचे सर्व अधिकार शरद पवार यांचे आहेत. चुकीच्या पद्धतीने संविधानाची चिरफाड सुरू आहे. जो अन्याय शरद पवारांवर झाला परत दुसऱ्या कोणावर होऊ नये. कोणाची सत्ता परमनंट नसते, अशा शब्दांत सुप्रिया सुळेंनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागले.
उपोषण केल्याशिवाय सरकार ऐकतच नाही : सुप्रिया सुळे
“हे महाराष्ट्र सरकारचे अपयश आहे. इथे प्रत्येक गोष्टीसाठी उपोषण करावं लागत आहे. आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी उपोष, पेपरफुटीसाठी उपोषण, जरांगे पाटील देखील उपोषण करत आहेत, उपोषण केल्याशिवाय सरकार ऐकतच नाही.” अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनावर खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
….तर मुंबईत जाणार! जरांगेंचा इशारा
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस असून, राज्याच्या विविध भागातून आंदोलक मोठ्या संख्येने अंतरवाली सराटी येथे दाखल होत आहेत. जर येत्या पंधरा दिवसांमध्ये आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर १२ सप्टेंबरला आम्ही मराठा समाजाची बैठक बोलावू आणि त्यामध्ये मुंबईमधील आंदोलनाची घोषणा करू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मराठा आंदोलनामुळे सरकारची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
The Great Khali Accident : WWE रेसलर द ग्रेट खली यांच्या गाडीचा अपघात! नेमकं काय घडलं?






