सोनिया गांधींचं मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; संजय राऊतांनी दिला चर्चेला पूर्णविराम, म्हणाले…

सोनिया गांधींच्या पत्रावरील चर्चेला संजय राऊतांकडून पूर्णविराम

मुंबई – काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही दिवसापूर्वी पत्र पाठवून सूचना केल्या आहेत. त्यांच्या या पत्रावरून राज्यात दबाबाचं राजकारण सुरू असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चेला आता शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पूर्ण विराम दिला आहे.

सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या पत्रासंदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले,”महाराष्ट्र आणि राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी एखादा कार्यक्रम काँग्रेस पुढे आणत असेल, तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे. यात कोणतंही दबावाचं राजकारण नाही,” असे म्हणत राऊत यांनी सोनिया गांधींनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रावरून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

“राज्यातील महाविकास आघाडीचा सहकारी म्हणून, काँग्रेस पक्ष समाजातील दुर्बल घटक, विशेषत: दलित, आदिवासी, ओबीसी आणि इतर उपेक्षित लोकांचे संरक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. महाविकास आघाडी सरकारने वंचित-उपेक्षित वर्गासाठी कल्याणकारी उपक्रम राबवावे, अशी सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.