Electric Vehicle : इलेक्ट्रिक वाहनांना अनुदानवाढ नाही, केंद्र सरकारने केलं स्पष्ट…

नवी दिल्ली – सरकारने फेम दोन या अनुदान योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांना 31 मार्चपर्यंत अनुदान अगोदरच जाहीर केले आहे. या अनुदानाला मुदत वाढ दिली जाणार असल्याच्या अफवा काही वृत्त माध्यमातून पसरल्या आहेत. मात्र केंद्र सरकारने याचा इन्कार केला असून 31 मार्चनंतर फेम दोन या योजनेला मुदतवाढ देण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
माध्यमातील वृत्तानुसार केंद्र सरकारने 31 जुलैपर्यंत या योजनेला मुदतवाढ दिली असून यासाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली आहे असे म्हटले होते. मात्र या वृत्तांत कसलेही तथ्य नसल्याचे केंद्रीय अवजड उद्योग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
https://wordpress-1295094-4705890.cloudwaysapps.com/indias-gst-collection-increases-12-5-to-rs-1-68-lakh-crore-in-february/
मात्र आहे त्या मुदतीत अनुदानाची रक्कम दहा हजार कोटी रुपयाहून 11 हजार 500 कोटी रुपये इतकी केली असल्याचे स्पष्टीकरण करण्यात आले.





