मुंबई – शिंदे गटाच्या “महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्यात जात आहे. अशात राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे. यावर आता पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पालघर येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात बोलत असतांना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. एका जाहिरातीमुळे आमच्यात दुरावा निर्माण होणार नाही असे त्यांनी जाहिरात वादावर फडणवीस यांनी आपलं मत मांडलं आहे. ते पुढे म्हणाले, आमच सरकार हे जनसामान्यच सरकार आहे. आम्ही मविआ सरकार सारखे कधीच भाषण कोण पहिले देणार यावरून भांडलो नाही. आमच्या सरकारने जनसामान्यांसाठी काम केले आहे. आमचं सरकार लाखो लोकांन पर्यंत पोहचतेय’ अस म्हणत फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली आहे.’ फडणवीस पुढे म्हणाले,’मी सांगू इच्छितो की, आमचा एकत्रित प्रवास २५ वर्षांचा आहे. पण आता गेल्या वर्षभरात तो अधिक घट्ट झाला आहे. त्यामुळे आमच्या प्रवासाची चिंता करण्याचं कारण नाही. तो कालही सोबत होता. आजही सोबत आहे आणि पुढेही राहील. कारण आम्ही सरकार तयार केलं खुर्चा तोडण्यासाठी नाही, आम्ही पदं मिळवण्यासाठी सरकार स्थापन केलेलं नाही. तर हे जनतेच्या सेवेसाठी स्थापन करण्यात आले आहे.’ दरम्यान, शिंदे गटाच्या “महाराष्ट्रात शिंदे’ या जाहिरातीवरून भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला तणाव आणखी वाढण्यात जात आहे. अशात राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहे.