मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल रात्री काही अज्ञात लोकांकडून हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास मुंबई क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. यानंतर आरोपींना हजर करण्यात आले. कोर्टातील सुनावणी नंतर गुन्हे शाखेने पत्रकार परिषद घेतली.
बाबा सिद्दीकी यांना 15 दिवसांपूर्वीच जीवे मारण्याची धमकी आली होती, अशी माहिती समोर आली होती. त्यामुळे बाबा सिद्दीकी यांना Y दर्जाची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती समोर येत होती. तसेच बाबा सिद्दीकी यांना Y दर्जाची सुरक्षा होती, अशी माहिती कालपासून समोर येत आहे. पण मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार परिषदेत याबाबत मोठा खुलासा केला.
गुन्हे शाखेने केला मोठा खुलासा
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवेळी त्यांना कोणत्याही कॅटेगरीची सुरक्षा नव्हती. तर त्यांच्या सुरक्षेसाठी केवळ 3 पोलीस कर्मचारी तैनात होते, असा मोठा खुलासा गुन्हे शाखेकडून करण्यात आला आहे.
तपासासाठी 15 टीम तैनात
या प्रकरणाच्या तपासासाठी 15 टीम तैनात करण्यात आल्या आहेत. आम्ही प्रत्येक अँगलने तपास करतोय. आम्हाला बाहेरच्या राज्यातील पोलिसांची मदत हवी आहे. ती मदत घेतली जात आहे. टेक्निकल, ग्राऊंड इन्वेस्टीगेशन आणि इतर गोष्टींचा मदत घेऊन आम्ही तपास करत आहोत. लॉरेन्स बिश्नोई किंवा सलमान खान किंवा इतर कुठला अँगल असेल त्या सर्व अँगलने आम्ही तपास करत आहोत” असे पोलिसांनी म्हंटले आहे.
कशी असते Y कॅटेगरी सुरक्षा ?
Y कॅटेगरी सुरक्षा अंतर्गत एका व्यक्तीला 11 सुरक्षाकर्मी मिळतात, ज्यात अत्यंत प्रशिक्षित एनएसजी कमांडो आणि अन्य सुरक्षा अधिकारी असतात. या सुरक्षेमुळे कोणालाही संबंधित व्यक्तीकडे जवळ जाण्याची परवानगी दिली जात नाही. जर Y कॅटेगरीची सुरक्षा मिळाली असती तर शूटर्सना तिथेच निष्प्रभ करता आले असते. मात्र, बाबा सिद्दीकी यांच्या हत्येवेळी अशी कोणतीही सुरक्षा नव्हती, ज्यामुळे ही दुर्दैवी घटना घडली.