Trupti Desai : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका करण्यात आली. त्याला कारण होते, त्यांची कन्या ज्ञानेश्वरी हिचा शाही थाटात पार पडलेला साखरपुडा. या सोहळ्यावरून महाराजांना त्यांच्या कीर्तनातील एका वाक्याची आठवण नेटकऱ्यांनी करून देत त्यांना ट्रोल केले. साध्या पद्धतीने लग्न केलं तरी मुलं होतात असे अजब विधान महाराजांनी केले होते. या विधानातून लग्नाचा खर्च टाळण्याचा सल्ला त्यांनी लोकांना दिला होता. मात्र, त्यांनी स्वतः मुलीच्या साखरपुडा सोहळ्यासाठी मोठा खर्च केला. सोहळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर इंदुरीकर महाराज यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. या सगळ्यातून उद्विघ्न होत इंदुरीकर महाराज यांनी थेट आता कीर्तन सोडण्याचा निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले आहे. येत्या काही दिवसांत ते व्हिडीओ टाकणार असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे. एकीककडे टीका होत असताना राष्ट्रवादीच्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी सोशल मीडियावरून पोस्ट शेअर करत महाराजांना फेटा खाली ठेवू नका, अशी विनंती केली आहे. त्यानंतर आता इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तन सोडण्याच्या निर्णयानंतर सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी इंदुरकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “इंदोरीकर महाराज तुम्हाला कीर्तन सोडायचं की नाही हा सर्वस्वी तुमचा निर्णय आहे, पण कीर्तन सोडून तुम्ही कॉमेडी शो सुरू करा,” असा अजब सल्ला त्यांनी महाराजांना दिला आहे. आता तुम्हाला वाटत असेल की…. जेव्हा तुम्ही मुलीचा साखरपुडा शाही थाटात साजरा केला आम्हाला त्याबद्दल काहीच अडचण नाही. परंतु, तुम्ही जेव्हा सांगता की साधं लग्न केलं तरी मुलं होतातच किंवा कोणी वरात काढली कोण्या मुलीच्या ड्रेसवर बोलता अनेक बदनामकारक गोष्टी बोलला तेव्हा तुमच्यावर बोललं गेलं आहे. आता तुम्हाला वाटत असेल की हे लोक तुमच्या घरापर्यंत बोलले, पण तुमच्या घरापर्यंत बोलण्याचा संबंध नव्हता, असे तृप्ती देसाई यांनी म्हटले आहे. तुमचं कीर्तन नसतंच ती कॉमेडीच असते आता तुम्हाला वाटत असेल की फेटा ठेवावा आणि हे बंद करावे तर तो तुमचा निर्णय आहे. कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांना बोलता तेव्हा तुम्हाला मजा वाटते, तुम्ही हसता, तुम्ही टाळ्या वाजवायला लावता आणि तुमच्या घरापर्यंत आलं तर तुम्हाला वाईट वाटतंय, असे म्हणत इंदुरीकर महाराज यांच्यावर तृप्ती देसाई यांनी निशाणा साधला. पुढे त्या म्हणाल्या, तुम्हाला कीर्तन करायचं नाही करायचं हा तुमचा प्रश्न आहे. शेवटी तुमचं कीर्तन नसतंच ती कॉमेडीच असते त्यामुळे तुम्ही कीर्तन बंद करा आणि कॉमेडी शो सुरु करा. हेही वाचा : “टायगर अभी जिंदा है…”; जेडीयू कार्यालयाबाहेर नितीशकुमारांच्या समर्थनार्थ पोस्टर्स, आरजेडीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया