“…तर आम्ही फाशीला परवानगी दिली नसती”; ओमर अब्दुल्लांचे अफजल गुरुबाबत धक्कादायक विधान

Omar Abdullah on Afzal Guru Hanging| नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी 2001 च्या संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरुच्या फाशीबाबत मोठे विधान केले आहे. अफझल गुरूला फाशी देऊन काहीच साध्य झाले नाही. जम्मू-काश्मीरच्या हातात असते तर आम्ही या फाशीला कधीही मान्यता दिली नसती, असे धक्कादायक विधान ओमर अब्दुल्ला यांनी केले आहे. सध्या त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा होत असून यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ओमर अब्दुल्ला म्हणाले की, “अफझल गुरुला फाशी देण्यात जम्मू-काश्मीर सरकारची कोणतीही भूमिका नाही. जम्मू आणि काश्मीर सरकारचा आणि अफझल गुरूच्या फाशीचा काहीही संबंध नव्हता. अफझलला फाशी देऊन कोणताही हेतू साध्य झालेला नाही. अफझल गुरुच्या फाशीसाठी जम्मू-काश्मीर सरकारची परवानगी आवश्यक असती, तर आम्ही परवानगी दिली नसती.”
“आम्ही फाशीच्या शिक्षेच्या विरोधात आहोत. न्यायालयांच्या अयोग्यतेवर आमचा विश्वास नाही. भारतात नाही, पण इतर देशांमध्ये जिथे-जिथे लोकांना फाशी दिली गेली, ते निर्णय नंतर चुकीचे ठरले. भारत किंवा भारताबाहेरील देशांमधील पुराव्यांनी हे वेळोवेळी दाखवून दिले आहे की, एखाद्या व्यक्तीला फाशी दिल्यानंतर आपण चुकीचे होतो, हे सिद्ध झालेले आहे.” दरम्यान, ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजप नेते साजिद युसूफ म्हणाले की, “अफजल गुरुला फाशी देणे हे जम्मू-काश्मीरमधील लोकांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.” Omar Abdullah on Afzal Guru Hanging|
संसदेवर भीषण दहशतवादी हल्ला
पाच दहशतवादी जुन्या संसदेच्या आवारात १३ डिसेंबर २००१ रोजी सकाळी ११.४० वाजता घुसले. गृहमंत्र्यांचा स्टिकर लावलेल्या गाडीमध्ये हे पाचही जण होते. त्यावेळी सुरक्षा रक्षकांना सदर गाडीबाबत संशय आल्यानंतर गाडीला मागे जाण्यास सांगितले गेले. यामुळे दहशतवाद्यांनी गाडीतून बाहेर पडत अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.
जवळपास ३० मिनिटे गोळीबार सुरू होता. या चकमकीत पाचही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात नऊ लोक शहीद झाले. त्यामध्ये दिल्ली पोलिस दलातील पाच जणांचा समावेश होता. तर केंद्रीय राखीव पोलिस दलातील एक महिला, संसदेतील दोन कर्मचारी आणि एका पत्रकाराचा समावेश होता. Omar Abdullah on Afzal Guru Hanging|
अफजल गुरुला फाशी देण्याचा आदेश
या घटनेनंतर पोलिसांनी काही तासांतच या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार अफजल गुरूला अटक केली होती. २६ सप्टेंबर २००६ रोजी सर्वोच्च न्यायालयाने अफजल गुरुला फाशी देण्याचा आदेश दिला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर ९ फेब्रुवारी २०१३ साली त्याला फाशी देण्यात आली.
हेही वाचा:





