Supriya Sule : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, शरद पवारांचा दाखला देत सुप्रिया सुळेंचे सूचक वक्तव्य…

पुणेः राज्यात मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून वातावरण तापलेले आहे. खंडणीच्या गुन्ह्याच्या आरोपात वाल्मीक कराडला पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे. तसेच कराडवर देशमुख यांच्या हत्येचा देखील आरोप करण्यात येत आहे. कराड यांचे संबंध मंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्याने विरोधकांकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणावर खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात सावित्रीबाई फुले यांना वंदन केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला.
आदरणीय पवार साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांच्या टीमवर जे आरोप झाले, त्या काळात त्या मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून योग्य ती पावले उचलली. अहो, कशाला लांब जायचं? काँग्रेसच्या काळात जेव्हा अशोक चव्हाणांवर आरोप झाले, तेव्हा अशोकरावांनीही नैतिकता जपत राजीनामा दिला होता. त्यामुळे आता माननीय मुख्यमंत्री आणि त्यांच्या पक्षातील लोकांनीही समाजातील भावना ओळखून योग्य निर्णय घ्यावा
.२४ दिवस हिच स्टोरी
कराड याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावल्यानंतर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, शरद पवारांवर ज्यावेळी आरोप झाले तेव्हा त्यांनी राजीनामा दिला होता. मॅारलिटी बघून निर्णय घ्यायला हवा, असे त्या म्हणाल्या. तसेच २४ दिवस झाले हीच स्टोरी आहे. संवेदनशील घटनेच्या बाबत विरोधकांनी सरकारला का सांगायचं असा सवाल सुळे यांनी सरकारला केला आहे.
२०२५ मी बोलले ते दिसेल
सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना आणली. पण या योजनमुळे सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडेल असे बोलले गेले होते. यावर बोलताना सुळे म्हणाल्या, मी मागच्या वेळेस जे बोलले ते तुम्हाला २०२५ मध्ये हळूहळू दिसेल. वित्तीय तूट व्यवस्था हा कायदा अटलजी यांनी आणला होता, त्याबद्दल विचार केला पाहिजे. या क्षेत्रातील अनेक एक्स्पर्ट आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो आहेत
भुजबळांसोबत आमचे कौटुंबिक संबंध
राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. मंत्री छगन भुजबळ यांच्याविषयी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, भुजबळ परिवाराशी आमचे अनेक वर्षांपासून कौटुंबिक संबंध आहेत. आमच्यात कधी ही अंतर आलेले नाही. आम्ही त्यात कधी ही राजकारण आणले नाही आणि अणाणर पण नाही.





