“…तर वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू’
Updated On:

पुणे – करोना काळातही राजकीय मेळावे, निवडणुका होत आहेत. त्यामध्ये गर्दीवर बंधन नाही. मग, छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावर इतकी बंधने कशासाठी? असा सवाल शेतकरी मराठा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांची उपस्थित केला आहे.
शिवजयंती साजरी करण्यातील अटी शिथिल कराव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू, असा इशारा दहातोंडे यांनी दिला आहे.
शिवजयंती कार्यक्रमास केवळ 100 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. प्रभातफेरी, बाइक रॅली काढण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.





