Manoj Jrange Patil | महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. शनिवारी झालेल्या मतमोजणीत महायुतीने २८८ पैकी २३५ जागा जिंकून महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केला. मराठवाड्यातील आठ लोकसभा मतदारसंघापैकी सात ठिकाणी महायुतीचा पराभव झाला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत चित्र पूर्णत: वेगळे पाहायला मिळाले. यावरून जरांगे फॅक्टर अपयशी ठरल्याची टीका केली जाऊ लागली. यावर आता मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आम्ही विधानसभेत कोणत्याही पक्षाला पाठिंबा दिला नव्हता. आम्ही मैदानातच नव्हतो. मी मराठा समाजाला बंधनमुक्त केले होते. त्यांना ज्यांना मतदान करायचे असेल ते करावे, असे मी जाहीर केले होते. त्याप्रमाणे मराठा मतदारांना जे काही करायचे होते आणि ते केले. त्यामुळे महायुती सरकार निवडून येण्यात मराठा समाजाचाही वाटा आहे. मराठा समाज सर्व पक्षात विखुरलेला आहे. त्यामुळे त्यांनी तिथे तिथे पूर्ण ताकदीने काम केले”, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. Manoj Jrange Patil | आमचा कोणताही फॅक्टर नव्हता “मी राज्यात कुठे गेलो का, आलेले सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आलेलं आहे. आम्ही मैदानात पाहिजे होतो तेव्हा दाखवला असता आमचा पॅर्टन. मराठा आरक्षण लवकर द्यायचं. बेमानी करायची नाही असा सरकारला पुन्हा इशारा देण्यात आला आहे. मी आणि माझा मराठा समाज मैदानात नव्हतो. आमचा कोणताही फॅक्टर नव्हता. असा काही फॅक्टर असता तर महायुतीला इतके यश मिळाले नसते. मराठा फॅक्टर आणि जरांगे फॅक्टर समजून घेण्यासाठी उभी हयात जाईल, आम्हाला आव्हान देणाऱ्यांना आम्ही किंमत देत नाही. सरकारचा शपथविधी झाल्यावर आम्ही समाजाची बैठक घेणार आहोत आणि आंदोलनाची दिशा ठरवणार आहोत. सरकारने तातडीने मराठा आरक्षण द्यावं नाही तर पुन्हा मराठे छाताडावर बसतील,” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. Manoj Jrange Patil | “आमचं समीकरण जुळलं नाही म्हणून आम्ही बाजूला राहिलो. कोणाचेही सत्ता आली तरी मला आणि समाजाला संघर्ष करावा लागणार आहे. कोणीही माजात आणि मस्तीत राहायचं नाही हुरळून जायचं नाही. मराठ्यांना छेडण्याचं काम करायचं नाही. मी निवडणुकीत सांगितलं होतं मराठा समाज मालक आहे योग्य लोकं निवडा. मी मराठा मुक्त केला होता, मी कोणाच्याही दावणीला बांधला नव्हता,” असा दावाही त्यांनी केला आहे. Manoj Jrange Patil | मैदानात नव्हतो तर फॅक्टर फेल कसा झाला? “काल देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की मराठा समाज भाजपसोबत होता. मराठ्यांची विभागणी होऊ शकत नाही. एक महिनाभर थांबा, तुम्हाला मराठ्यांची ताकद कळेल. या निवडणुकीत मराठ्यांचे 204 आमदार झाले. मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणीही सत्तेत येऊ शकत नाही. गोड बोलून मराठ्यांची मते घेतली. आता सत्ता आली तर नीट कारभार करा,” असा टोलाही त्यांनी महायुतीला लगावला.