जुन्नर तालुक्यात चोरीचे सत्र सुरूच;बंदुकीचा धाक दाखवून दुकानदाराला लुटले; घटना सीसीटिव्हीत कैद

Updated On:

आळेफाटा – आळेफाटा येथे चार दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवून दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची घटना सोमवारी (दि ७) रात्री साडेदहा वाजता घडली.

याबाबत मिळालेली माहिती अशी की आळेफाटा येथे बोरी बुद्रुक येथील अविनाश पटाडे यांचे साई इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान असून सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश करुन त्यांना बंदुकीचा धाक दाखविला व दुकानातील १८ हजार रुपये व मोबाईल चोरून नेली असल्याची माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली.

ही घटना सी सी टीव्हीत कैद झाली आहे या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व पोलिस निरिक्षक मधुकर पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली असून पुढील तपास सुरु आहे .

काही दिवसांपूर्वीच चौदानंबर येथील अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा पडला होता त्यामध्ये पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला होता या घटनेचा तपास अद्याप सुरूच आहे.

ही घटना ताजी असतानाच आळेफाटा येथे पुन्हा बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे तालुक्यात वारंवार अशा घडत असल्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Karad News: 'मास्क' घातलेल्या चोरट्यांनी घरे फोडली, अपार्टमेंटमध्ये घुसून धुमाकूळ

2026-08-20 12:38:44

Karad News: 'मास्क' घातलेल्या चोरट्यांनी घरे फोडली, अपार्टमेंटमध्ये घुसून धुमाकूळ

Crime News : जुन्नरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; निष्पाप चिमुरडी ठरली वासनेची शिकार, नेमकं काय घडलं?

2026-08-19 09:35:05

Crime News : जुन्नरमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना; निष्पाप चिमुरडी ठरली वासनेची शिकार, नेमकं काय घडलं?

Leopard captured : पिंपरखेडमध्ये आठ वर्षीय नर बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास

2026-08-18 16:34:41

Leopard captured : पिंपरखेडमध्ये आठ वर्षीय नर बिबट्या जेरबंद; ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा निःश्वास

Shirur News : उरळगावात दोन शेतकऱ्यांच्या बोअरमधील मोटारींसह केबलची चोरी; 17 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-08-16 15:34:39

Shirur News : उरळगावात दोन शेतकऱ्यांच्या बोअरमधील मोटारींसह केबलची चोरी; 17 हजारांचा मुद्देमाल लंपास

Semi-high-speed railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा फेरविचार; 'जीएमआरटी' संरक्षणासाठी अनिल काकोडकर समिती स्थापन

2026-08-05 22:40:03

Semi-high-speed railway : पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा फेरविचार; 'जीएमआरटी' संरक्षणासाठी अनिल काकोडकर समिती स्थापन