Kayanat Dhar : रेवती सुळे यांच्या लग्नात पार्थ पवारांसोबत दिसलेल्या ‘या’ तरुणीची चर्चा; कोण आहे कायनात धर?
Kayanat Dhar : सर्वाधिक चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार यांच्यासोबत आलेल्या एका काश्मिरी तरुणीची.

Kayanat Dhar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची नात रेवती सुळे आणि उद्योगपती अरुण लखानी यांचे पुत्र सारंग लखानी यांचा विवाहसोहळा नुकताच मुंबईत अत्यंत दिमाखात पार पडला. सुप्रिया सुळे आणि सदानंद सुळे यांच्या कन्येच्या लग्नासाठी देशभरातील राजकीय, उद्योग, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत नवदांपत्याला शुभेच्छा दिल्या.
या भव्य सोहळ्यात अनेक दिग्गजांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मात्र सर्वाधिक चर्चा झाली ती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पुत्र पार्थ पवार यांच्यासोबत आलेल्या एका काश्मिरी तरुणीची. पवार कुटुंबीयांसोबत तिची उपस्थिती पाहून सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळात ‘ही तरुणी नेमकी कोण?’ याबाबत चर्चा आणि उत्सुकता निर्माण झाली.
कोण आहे कायनात धर?
या तरुणीचे नाव कायनात धर असून ती मूळची काश्मीरची असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ती दिल्लीत वास्तव्यास असल्याचे सांगितले जाते. कायनातचे पवार कुटुंबाशी जवळचे संबंध असल्याची चर्चा आहे. काही काळापूर्वी सुनेत्रा पवार काश्मीर दौऱ्यावर गेल्या असताना त्यांचा पाहुणचार कायनातच्या कुटुंबीयांनी केल्याचेही बोलले जाते.
हेही वाचा : Monsoon Update: मान्सून पुन्हा सक्रिय होणार; पुढील 3 ते 4 दिवसांत पाऊस बरसण्याचा अंदाज
याआधीही पार्थ पवार आणि कायनात धर अनेकदा एकत्र दिसले आहेत. काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील महाकाल मंदिरातही दोघांनी एकत्र दर्शन घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले होते. त्यामुळे रेवती सुळे यांच्या लग्नातील तिच्या उपस्थितीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
पवार कुटुंबाच्या विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये कायनातची उपस्थिती सातत्याने दिसत असल्याने तिच्याबाबतची उत्सुकता अधिक वाढली आहे. लग्नसमारंभातही ती पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाली होती. मात्र तिच्याविषयी अधिकृत माहिती अद्याप समोर न आल्याने सोशल मीडियावर नेटकरी तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
अनेक मान्यवरांनी लावली उपस्थिती
दरम्यान, रेवती सुळे यांच्या विवाहसोहळ्याला शरद पवार, राहुल गांधी, मोहन भागवत, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, अमिताभ बच्चन, जया बच्चन, मुकेश अंबानी, गौतम अदानी, अनिल अंबानी, शाहरुख खान यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या सोहळ्यातील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, हा विवाहसोहळा वर्षातील सर्वाधिक चर्चेतील सोहळ्यांपैकी एक ठरला आहे.





