भिगवण -तक्रारवाडी (ता.इंदापूर) येथे उजनी धरण फुगवट्यात बुडत असलेल्या महिला व तीन मुलांचे प्राण वाचविण्यात मच्छीमार तरुणाला यश आले आहे.
त्यामुळे सहा जणांचे प्राण वाचविणाऱ्या मच्छीमाराची राष्ट्रपती जीवन रक्षक पदकासाठी शिफारस करण्याची सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी केली असल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी दिली आहे.
राजू नंदू परदेशी (रा. तक्रारवाडी, ता. इंदापूर) असे धरणात बुडणाऱ्या महिला व तीन मुलांचे प्राण वाचविणाऱ्या मच्छीमार तरुणाचे नाव आहे.