डंपरखाली सापडून महिलेचा मृत्यू

करजगाव – सोनई- वांबोरी रस्त्यावर धनगरवाडी फाट्याजवळ डंपरखाली सापडून करजगांव (ता.नेवासा) येथील छाया शंकर गायकवाड (वय 32) या महिलेचा डोक्‍याला मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. या अपघातात छाया यांचा नंदई संतोष भिमाजी शिंदे (रा. इसळक ता.नगर), तीन वर्षाचा मुलगा संदेश व दहा वर्षाची मुलगी कावेरी बचावले.

अपघातानंतर डंपर चालक पसार होत त्याने सोनई पोलीस ठाणे गाठले. यानंतर नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात छाया यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. छाया यांच्यावर करजगांव येथे सायकांळी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला.त्यांच्या पश्‍चात पती, एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.