पिंपरी – एका विवाहित महिलेला तिच्या माहेरच्याच नातेवाईकांनी भर रस्त्यात मारहाण केली. त्यानंतर घरी पतीनेही मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी बारा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
रेश्मा सुनील गायकवाड(वय 30, रा. पिंपरी) यांनी गुरुवारी (दि. 26) याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पती सुनील गायकवाड, आई इंदुबाई भास्कर डोंगरे, भाऊ प्रशांत डोंगरे, रमा राजू हाके, रोशनी किशोर सरवदे, राजू हाके, रेखा भालेराव, किशोर सरवदे, पंचशीला घनघाव, दीपक हरिभाऊ डोंगरे, राकेश उर्फ चैत्र घनघाव, अंगुली घनघाव अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी रेश्मा या कामावर चालल्या होत्या.
त्यावेळी त्यांच्या चार बहिणी, भाऊ, आई व इतरांनी मिळून त्यांना हाताने मारहाण केली. तर भाऊ प्रशांत याने कमरेच्या बेल्टने मारहाण केली, असे रेश्मा यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. रेश्मा यांच्या आईने रेश्मा यांना दुसऱ्या मुलाच्या गाडीवर बघितले असल्याचे त्यांचा पतीला सांगितले. यावरून पतीने देखील मारहाण केली.