शिरूर बसस्थानकाची भिंत कोसळली
Updated On:

शिरूर -शिरूर एसटी बसस्थानकाची सीमा भिंत शनिवार (दि.21) झालेल्या पावसाने अचानक रिक्षा स्टॅंड बाजूला कोसळली. यात दोन रिक्षा व दोन दुचाकींची मोठे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास शिरूर शहरामध्ये मुसळधार पाऊस पडत असताना शिरूर बस स्थानकाची बाजूची सीमाभिंत अचानक चाळीस ते पन्नास फूट लांब बाजूला असणाऱ्या खड्डयांमध्ये कोसळली. खड्डयाच्या बाजूला सिक्स सीटर रिक्षा व काहीजण पार्किंग करत असतात. सीमा भिंतीलगत रिक्षा पार्क केलेल्या असतात. पावसाळा आणि दुपारची वेळ असल्याने तेथे कोणीही नसल्यामुळे अचानक पडलेल्या भिंतीच्या दगड, विटा, माती ढिगाऱ्याखाली दोन दुचाकी गाढल्या गेल्या. दोन रिक्षांचे नुकसान झाले आहे. रिक्षाच्या काचा फुटल्या आहेत.





