Pune : प्रतीक्षा संपली ! उद्या सकाळी खुला होणार सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल
Updated On:

पुणे : सिंहगड रस्त्यावर राजाराम पुल चौकात उभारण्यात आलेला उड्डाणपूल उद्या (गुरुवारी) खुला केला जाणार आहे. पर्वती विधानसभा मतदार संघाच्या आमदार माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते हा पुल खुला केला जाणार आहे.
मागील आठवड्यात या पुलाचे काम पूर्ण झाले होते. त्यानंतर तो सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर ही तारीख निश्चित झाली असून नागरिकांसाठी उद्याच सकाळी ७ वाजता हा पुल खुला केला जाणार आहे. महापालिका प्रशासनाकडून प्रकल्प विभागास याबाबत सूचना करण्यात आली आहे. यावेळी महापालिका आयुक्त आणि पालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
टॅग्स:





