Raid 2 Release Date | अभिनेता अजय देवगणच्या ‘रेड’ चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यापूर्वी ‘रेड 2’ या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये रिलीज होणार होता. मात्र, निर्मात्यांनी विविध कारणांमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली. पण आता अजय देवगण रेड 2 चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे.
अजय देवगणने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘रेड 2’चे पोस्टर शेअर केले आहे. यासोबत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आयआरएस अमेय पटनायकचे पुढील मिशन मे 2025 पासून सुरू होत आहे! ‘रेड 2′ 1 मे 2025 रोजी रिलीज होणार आहे.’
पॅनोरमा स्टुडिओजच्या बॅनरखाली ‘रेड 2’ चे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कृष्ण कुमार, कुमार मंगत पाठक आणि अभिषेक पाठक यांनी केली आहे. यात अजय देवगण पुन्हा एकदा IRS अमेय पटनायकच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात वाणी कपूर आणि रितेश देशमुखही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘रेड 2’ हा सिनेमा 1 मे 2025 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार असल्याने आता चाहत्यांचीही प्रतिक्षा संपली आहे.
View this post on Instagram
अजय देवगनचा ‘रेड’ हा सिनेमा 2018 मध्ये रिलीज झाला होता. त्यावेळी हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. तेव्हापासून चाहते या सिनेमाच्या सीक्वेलची प्रतीक्षा करत होते. अखेर ‘रेड 2’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होणार आहे. Raid 2 Release Date |
अजय देवगणच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘सिंघम अगेन’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. याशिवाय पुतण्या अमन देवगणच्या ‘आझाद’ या डेब्यू चित्रपटात तो दिसणार आहे. हा चित्रपट 17 जानेवारी 2025 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याशिवाय अजय देवगण ‘गोलमाल 5’, ‘शैतान 2’, ‘दे दे प्यार दे 2’ आणि ‘सन ऑफ द सरदार 2’ या चित्रपटांमध्येही पाहायला मिळणार आहे.
हेही वाचा:
मोठी बातमी ! भंडारा, गोंदिया, गडचिरोलीत भूकंपाचे धक्के ; सर्वत्र भीतीचे वातावरण