अल्पेश ठाकोर यांच्यासह ‘या’ दोन आमदारांचा काँग्रेसला रामराम

गुजरात – लोकसभा निवडणुकीआधी गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला असून गुजरातमधील ओबीसी नेते अल्पेश ठाकोर यांनी आज सकाळीच काँग्रेसची साथ सोडली आहे. अल्पेश ठाकोर यांच्यासोबतच आणखीन दोन आमदारांनी काँग्रेसला रामराम ठोकला असून धवलसिंह ठाकोर आणि भारतजी ठाकोर अशी त्यांची नावे आहेत.

मागील काही महिन्यांपासून अल्पेश ठाकोर काँग्रेसची साथ सोडणार आणि भाजपामध्ये प्रवेश करणार, अशी चर्चा सुरु होती. मात्र, मार्च महिन्यात अल्पेश ठाकोर यांनी यावर स्पष्टीकरण देताना आपण काँग्रेस सोडणार नसल्याचे सांगत या चर्चेला पूर्णविराम दिला होता. मात्र आज अल्पेश ठाकोर यांनी थेट काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतल्याने गुजरातमध्ये  राजकीय भूकंप झाला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.