नवरात्रोत्सवात पारंपरिक कपडे भाड्याने घेण्याचा ‘ट्रेंड’ कायम

पिंपरी -नवरात्रोत्सव अगदी आठवड्यावर येऊन ठेपला आहे. त्यासाठी गरबा, दांडियाचे सूर उमटत असून या उत्सवात घागरा, चोली, धोती-कुर्ता, केडिया या पारंपरिक कपड्यांना मागणी आहे. सण- उत्सवामध्ये पारंपरिक कपडे भाड्याने घेण्याचा हा अनेक वर्षांचा “ट्रेंड’ आहे. आजही उत्सव आणि विविध कार्यक्रमांनिमित्त पारंपरिक कपडे भाड्याने घेतली जात आहेत.
येत्या रविवारपासून (दि. 15) नवरात्रोत्सवास सुरवात होत आहे. नऊ दिवस नऊ पद्धतीचे पोशाख खरेदी करणे प्रत्येकास शक्य नसते. यास पर्याय म्हणून अनेकजण पारंपरिक कपडे भाड्याने घेऊन दांडिया खेळण्याचा आनंद लुटतात. त्यात मोठ्या प्रमाणात महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा यात सहभाग असतो. नवरात्रोत्सवानिमित्त केडिया, धोती – कुर्ता, घागरा- चोली या पारंपरिक कपड्यांना भाडेतत्त्वावर घेण्याची मागणी वाढलेली आहे.
वर्षात एक-दोन वेळा वापर होत असल्याने अनेकजण खरेदी करत नाहीत. तसेच प्रत्येक वर्षी नवा कोरा ड्रेस घेणेही परवडत नाही. त्यामुळे नवरात्रोत्सवात खास मारवाड, गुजराती पेरराव्याला मागणी असते. स्पर्धेत पारंपरिक पोषाखात सहभागी होण्याचे निमंत्रण असते. विजेत्यांना भरघोस बक्षिसे दिली जात असल्याने कपडे भाड्याने घेतात. तरुणाईकडून जास्त मागणी असते. उत्सवाच्या अगोदर बुकिंग केले जात असून आवडीनुसार फिटिंग तसेच त्याला साजेशे दागिने बुक केले जात आहेत, असे विक्रेत्यांनी सांगितले.
ऑक्साइडचे दागिने
काळा, लाल, पिवळा या रंगातील घागरा – चोली, केडिया या पोशाखावर वर्क केलेले असते. या कपड्यांवर खास ऑक्साइड दागिने घातले जातात. हे दागिनेही भाडेतत्वावर दिले जातात. ऑक्साइडचे गळ्यात, कानात आणि हातात कडे असे महिला, तरुणींसाठी तर, पुरुषांसाठी गळ्यात माळा आणि हातात कडे, डोक्यावर खास राजस्थानी पगडी असते. पोशाख आणि दागिने यांच्यासाठी वेगळा ठेव घेतली जाते.
नवरात्रीसाठी तयारी
पोशाख भाडे
घागरा चोली 200 ते 300
केडिया सूट 200 ते 300
इंडो वेस्टर्न 250 ते 350
धोती सूट 200 ते 300
लहान मुलांचे पोशाख 150 ते 200





