Sonali Kulkarni : गेल्या अनेक वर्षांपासून बॅालीवूड इंडस्ट्री ड्रग्जचा अड्डा झाल्याच्या चर्चा केल्या जात आहेत. ड्रग्ज प्रकरणात इंडस्ट्रीतील मोठ्या कलाकारांची नावं देखील समोर आली होती. अशातच आता मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने कलाकार आणि ड्रग्जबद्दल बॉलीवूडमधील एक धक्कादायक सत्य उघड करणार विधान केले आहे. वजन कमी करण्यासाठी कलाकार सर्रासपणे ड्रग्ज घेतात, असा धक्कादायक खुलासा तिने एका मुलाखती दरम्यान केला आहे. तसेच सोनाली स्वतःला फिट ठेवण्यासाठी सकस आहार आणि नियमित व्यायाम यावर भाष्य केले आहे. असं काही करण्याला तिचा विरोध आहे, असेही तिने म्हटले आहे. चित्रपटसृष्टीत वजन कमी करण्याचा ट्रेंन्ड वाढलाय. “मला कल्पना आहे की याची मागणी आहे, कारण मी पडद्यावर काम करते. तुम्ही जितके बारीक असाल, तितके तुम्ही पडद्यावर चांगले दिसता,” पण औषध म्हणून घेतलेल्या नातेसंबंधांवर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो, याची चिंता वाटते, असे सोनाली म्हणाली. माझ्या अनेक मैत्रिणींनी वजन कमी करण्यासाठी औषधही घेतली आहेत. मी माझ्या आयुष्यात अशा टप्प्यावर आहे, जिथे मी स्वतःला प्राधान्य देते. मी स्वतःला सांगत असते की ‘मी खास आहे. माझी साइज ही माझी साइज आहे. माझ्या आरोग्याची किंमत देऊन मला बारीक व्हायचं नाही, असे मत तिने व्यक्त केले आहे. सोनाली पुढे असेही म्हणाली की, माझ्या अनेक मैत्रिणी वजन कमी करण्यासाठी औषध घेत आहेत. मला वाटतं की आपण हे सगळे कशाच्या किंमतीवर घेत आहोत? असा प्रश्न तिने उपस्थित केला आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी नुकतीच सुशीला सुजीत या चित्रपटात अभिनेता स्वप्नील जोशीसोबत दिसली होती. Oops Ab Kya? या नावची तिची वेबसिरीज देखील नुकतीच प्रदर्शित झाली आहे.