Maharashtra Police Transfer – राज्य पोलीस दलातील आयपीएस अधिकार्यांच्या बदल्याचे सत्र सुरूच असून गुरुवारी गृहविभागाने राज्यातील अन्य 31 आयपीएस अधिकार्यांची बदली केली आहे. त्यात चार अतिरिक्त पोलीस आयुक्तांसह 27 पोलीस उपायुक्त-अधिक्षक दर्जाच्या अधिकार्यांचा समावेश आहे. एका पोलीस अधिक्षकाला अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बढती देण्यात आली आहे. गृहविभागाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी हे आदेश जारी केले आहे. बदली झालेल्यांमध्ये पाच अतिरिक्त पोलीस आयुक्त दर्जाच्या पोलीस अधिकार्यांचा समावेश आहे. त्यात नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शिवाजी राठोड यांची ठाणे, पुणे दहशतवाद विरोधी पथकाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रमोद शेवाळे यांची नवी मुंबई, बदलीच्या प्रतिक्षेत असलेले विनिता साहू यांची मुंबई राज्य राखीव पोलीस बदलाच्या पोलीस उपमहानिरीक्षक, या जागी असलेले पोलीस उपमहानिरीक्षक अशोक दुधे यांची ठाणे, बिनतारी संदेश विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आर राजा यांची मुंबई बिनतारी संदेश विभागात बदली दाखविण्यात आली आहे. यावेळी आर राजा यांना बढती देऊन त्यांची अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.