विविध महाविद्यालयांच्या यशाची परंपरा कायम

क्रिसेंट ज्युनिअर कॉलेजचा निकाल शंभर टक्‍के
पुणे – गुलटेकडी येथील क्रिसेंट हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. ज्युनिअर कॉलेजचे बारावीच्या परीक्षेचे हे पहिलेच वर्ष होते. वाणिज्य शाखेतून 30 विद्यार्थी व विज्ञान शाखेतून 18 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. साहिल सुनील सपकाळ हा विद्यार्थी 83.23 टक्‍के गुण मिळवून कॉलेजमध्ये प्रथम आला. नितीन मोहन गेहलोत हा विद्यार्थी 81.85 टक्‍के गुण मिळवून द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. फराह दारूवाला व हिना दारूवाला यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्राचार्या एम.ए. दारूवाला यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

“मॉडर्न’च्या विद्यार्थ्यांचे यश
पुणे – शिवाजीनगर येथील मॉडर्न कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 81 टक्‍के इतका लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 96.29 टक्‍के, विज्ञान शाखेचा 75.76 टक्‍के आणि कला शाखेचा 71.30 टक्‍के इतका लागला आहे. वाणिज्य शाखेतून ऋषभ जैन हा 92.61 टक्‍के घेत प्रथम आला आहे. तसेच, महाविद्यालयात अंध विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहेत, अशी माहिती प्राचार्य डॉ. आर. एस. झुंजारराव यांनी दिली.

आझम कॅम्पस कॉलेजचे यश
पुणे – महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या “आबेदा इनामदार ज्युनियर कॉलेज फॉर गर्ल्स’चा निकाल 91 टक्के आणि “अँग्लो उर्दू बॉईज हायस्कुल’चा बारावी परीक्षेचा निकाल 82 टक्के लागला आहे. गर्ल्स कॉलेजच्या वाणिज्य शाखेत आयेशा इरफान खान, शास्त्र शाखेत आलिया झुबेर शेख, कला शाखेत हुमेरा अफझल मेमन, व्होकेशनल मध्ये उझ्मा शफिक चौधरी प्रथम आली. उर्दू मुलांच्या हायस्कूलच्या शास्त्र शाखेत प्रसाद ठोंबरे प्रथम, वाणिज्य शाखेत जॉन जोसेफ आणि कला शाखेत सौद चौधरी प्रथम आला आहे. प्राचार्य आयेशा शेख, उपप्राचार्य अब्दुल गफार सय्यद, प्राचार्य परवीन शेख यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले .

अशोक कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल 98.36 टक्के
पुणे – बारावीच्या परीक्षेत टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र विद्यार्थी सहायक मंडळ संचालित अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 98.36टक्के लागला आहे. अथर्व चांडक (95%), साईराज कांबळे (92%), सिमरन खन्ना आणि अपूर्वा होतकर (91%) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. अथर्वने 95 टक्के मिळवत जेईईच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकविला आहे.

विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्ष सुमन घोलप यांनी अभिनंदन केले. यावेळी अथर्व चांडक याची जेईई परीक्षेत निवड झाल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. विकास आबनावे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख रेखा दराडे, विद्यार्थी मार्गदर्शक प्रथमेश आबनावे, ज्योती हिरे, कार्यकारी मंडळ सदस्य प्रसाद आबनावे यांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रत्येक वर्षी अशाच पद्धतीने चांगले गुण मिळवून विद्यार्थी आमची मान उंचावतात. दरवर्षी विद्यार्थ्यांचा यशाचा टक्का हा वाढतच जातो याबद्दल अभिमान आहे, असे संस्थेचे सचिव डॉ. विकास आबनावे यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.