पिंपरी | देहूतील शाळांची निकालाची परंपरा कायम

देहूगाव, (वार्ताहर) – देहू, देहूरोड परिसरातील दहावीत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. काही शाळांनी १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या संत तुकाराम विद्यालयाचा निकाल ९९.०५ टक्के लागाला आहे. यामध्ये गाडे प्रणाली भरत (९३.०३),
नाबदे साक्षी शिवाजी (९०.४०), काळे आर्यन दीपक (९०.२०) टक्के गुण मिळविले आहेत. संत जिजाबाई कन्या विद्यालयाचा निकाल ९६.९८ टक्के लागला असून यामध्ये बोत्रे वैष्णवी संतोष (९५.४०), केंद्रे जया ईश्वर (९२.६०), पाटील अनुष्का विजय (९१.४०) टक्के गुण मिळवून अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांक पटकावला आहे.
साकोरे शिक्षण संस्थेच्या जगद्गुरु इंग्लिश मीडियम स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. तांदळे यश नागनाथ (९४.२०), शिंगे आयुष रमेश आणि पाटील पियुष रमेश (९०.४०), इंगळे सुमेध विनोद (८७.८०) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतिय क्रमांक पटकावला आहे.
सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन संतोष साकोरे, खजिनदार दिपाली साकोरे, मुख्याध्यापक, शिक्षकांच्या वतीने यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. फोर एस इंग्लिश मिडीयम स्कूलनेही १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.
विद्यालयाचे संस्थापक अँड.सुनील काळोखे, पवन काळोखे, मुख्याध्यापिका प्रणिता काळोखे यांनी ही माहिती दिली. शाळेत ऋतुजा आवारे (९२.६०), सुजल बढे (९०.६०), ज्ञानेश्वरी उगले (८९.६०) टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाले आहेत.





