देशातील एकूण कोविड चाचण्या 1.77 कोटींच्या पुढे

नवी दिल्ली – देशभरात गेल्या 24 तासांत 4 लाख 8 हजार 855 नमुना चाचण्या करण्यात आल्या, यामुळे प्रतिदशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या वाढून आता 12 हजार 858 झाली आहे आणि एकूण चाचण्यांची संख्या 1 कोटी 77 लाखांच्या पुढे गेली आहे.

देशातील 1,316 प्रयोगशाळांसह चाचणी प्रयोगशाळेचे जाळे सातत्याने बळकट केले जात आहे. सध्या 906 सरकारी प्रयोगशाळा आणि 410 खासगी प्रयोगशाळा कार्यरत आहेत. या मध्ये रिअल टाइम रॅपिड टेस्ट पीसीआर आधारित चाचणी प्रयोगशाळा 675, ट्रू नॅट आधारित चाचणी प्रयोगशाळा 537, सीबीएनएएटी आधारित चाचणी प्रयोगशाळा 104 आहेत.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयाने कोविड-19 संक्रमण आणि भारतात तंबाखूचा वापर हे प्रकाशन प्रस्तुत केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.