काळ आला होता पण ‘वेळ’ नाही! ताफ्यातील वाहनांचा मोठा अपघात; तेजस्वी यादव थोडक्यात बचावले!

Tejashwi Yadav accident : काल मध्यरात्री बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील वाहनांचा मोठा अपघाताची घटना घडली आहे. ही दुर्घटना तेजस्वी यादव हे मधेपुरामधील कार्यक्रम ओटापून पाटण्याच्या दिशेने परतत असताना घडली. त्यांच्या ताफ्यातील दोन ते तीन वाहनांना अनियंत्रित झालेल्या ट्रकने जोरदार धडकी दिल्याने ही अपघाताची घटना घडली आहे. या घटनेत तेजस्वी यादव हे थोडक्यात बचावणे आहेत. मात्र, या अपघातात तीन जण जखमी झाल्याची माहिती आहे.
नेमकी घटना कशी घडली ?
बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव आपला नियोजित धेपुरामधील येथील कार्यक्रम आटोपून पाटणाच्या दिशेने हाजीपूर-मुजफ्फरपूर राष्ट्रीय महामार्ग २२ वरील निघाले होते. त्यांच्या ताफ्यातील वाहनांचा ताफा गोरौल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गोधिया पुलाजवळ एका चहाच्या टपरीवर विश्रांतीसाठी व चहा पिण्यासाठी थांबा घेतला होता. याचवेळी एका अनियंत्रित ट्रकने त्यांच्या ताफ्यातील दोन ते तीन वाहनांना जोराची धडक दिली. धडकेच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या अपघाताच्या दुर्घटनेत तीन कर्मचारी जखमी झाले. यानंतर तात्काळ बचावकार्य राबविण्यात आले. जखमींनी रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातात रामनाथ यादव, ललन कुमार आणि धर्मवीर कुमार हे चालक आणि सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. जखमींना स्वतः तेजस्वी यादव यांनी रुग्णालयात नेले. दरम्यान, पोलिसांनी पाटेढा टोल प्लाझाजवळ ट्रक जप्त केला असून चालकाला ताब्यात घेतले आहे.
बाल-बाल बचे बिहार के शान तेजस्वी यादव, मधेपुरा से लौटते समय अनियंत्रित ट्रक ने काफिले में टक्कर मार दी, एस्कॉर्ट वाहन में टक्कर से तीन पुलिसकर्मी गंभीर रूप से घायल हो गए. तेजस्वी यादव ने खुद अस्पताल में जाकर घायलों का इलाज कराया. #TejashwiYadav #BiharNews #madhepura #RJD pic.twitter.com/CMF02gnqKe
— Anil Kushwaha (@AnilKus61372462) June 7, 2025
तेजस्वी यादव काय म्हणाले ?
घटना मोठी नाहीये, परंतु अपघातात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. रस्ते अपघात दररोज घडतात आणि देशात यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे, अशी प्रतक्रिया विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी माध्यामांशी बोलताना दिली.
थोडक्यात बचावले….
या अपघातात तेजस्वी यादव हे फक्त पाच फूट अंतरावर होते, जर ट्रक आणखी थोडा पुढे आला असता तर या अपघातात त्यांनाही दुखापत झाली असती, असे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले.
हेही वाचा: मुंबई-नाशिक महामार्गावर कारमध्ये आढळले कुजलेले तीन मृतदेह; अपघात की घातपात? तपास सुरु





