The Kerala Story 2 Teaser : २०२३ मध्ये ‘द केरळ स्टोरी’ नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला चांगला प्रतिसाद प्रेक्षकांनी दिला. मात्र, चित्रपटातील काही सीनमुळे चित्रपट वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. त्यानंतर आता या चित्रपटाच्या सीक्वलची घोषणा करण्यात आली असून, ‘द केरळ स्टोरी २ गोज बियॉन्ड’ चित्रपटाचा दमदार टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरने पुन्हा एकदा प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता सहन करणार नाही… लढणार!” अशी या चित्रपटाची मुख्य टॅगलाइन आहे. या टीझरमध्ये तीन तरुणींची कहाणी दाखवण्यात आली आहे, ज्यांचे धर्मांतराच्या माध्यमातून शोषण केले जाते. या तिघी त्यांचं भयानक वास्तव टीझरमधून समोर आणतात. आधीच्या चित्रपटातील कलाकार सीक्वलमध्ये नाहीत. या चित्रपटात उल्का गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिती भाटिया मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पहिल्या भागाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले होते, तर सीक्वलचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कामाख्या नारायण सिंह यांनी केले आहे. टीझरसोबतच प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. ‘द केरळ स्टोरी २’ हा चित्रपट २७ फेब्रुवारी २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. २०२३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द केरळ स्टोरी’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत तब्बल ३०० कोटींहून अधिक कमाई केली होती. आता सीक्वला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. पहिल्या भागात लव्ह जिहाद आणि धर्मांतराच्या मुद्द्यावर आधारित असलेल्या कथेवरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता दुसऱ्या भागामुळे पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्यातून काय समोर येते आणि त्यानंतर प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटात काय दाखवण्यात येणार यावर वादाचे ढग घोंगवणारे की नाही हे ठरणार आहे. हेही वाचा : Amit Shah Dibrugarh Visit: “राहुल गांधींनी आसामचा अपमान केला…” ; अमित शहा यांचा काँग्रेसवर निशाणा, चहाबद्दल केले ‘हे’ मोठे विधान