‘द ग्रेट इंडियन कपिल शो’चा तिसरा सीझन येणार प्रेक्षकांच्या भेटीस; धमाकेदार प्रोमो समोर

The Great Indian Kapil Show 3 | टीव्हीवरील ‘द कपिल शर्मा शो’मधून कपिलने स्वत:ची एक ओळख निर्माण केली आहे. आता तो नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या माध्यमातून नव्याने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोच्या दोन यशस्वी सीझननंतर आता तिसऱ्या सीझनची घोषणा करण्यात आली आहे. नुकत्याच आगामी सीझनचा पहिला प्रोमो जारी करण्यात आला आहे.
या प्रोमोची सुरुवात कपिलच्या फोन कॉलने होते. तो अर्चना पूरण सिंगला फोन करतो, तेव्हा अर्चना सांगते की, सध्या बँकेत आले आहे. त्यावर कपिल मिश्कीलपणे म्हणतो, “कर्ज घेऊ नका, आपल्या शोचा तिसरा सीझन येतोय”. त्यानंतर कपिल आपल्या टीममधील किकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि सुनील ग्रोव्हर यांनाही फोन करतो. यावेळी तिसऱ्या सीझनमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळणार असल्याचा अंदाज बांधला जात आहे.
View this post on Instagram
24 मे रोजी तिसऱ्या सीझनचा एक धमाकेदार प्रोमो शेअर करत नेटफ्लिक्सने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, “आता हसणे होणार नियंत्रणाबाहेर, कारण कपिल आणि त्याची टोळी पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. आता प्रत्येक फनीवार वाढेल आमचं कुटुंब, ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या नव्या सीझनसह. नेटफ्लिक्सवर 21 जूनपासून स्ट्रिम होणार आहे.” येत्या 21 जूनपासून ‘द ग्रेट इंडियन कपिल शो 3’ मधून हास्याचा डोस मिळणार आहे. The Great Indian Kapil Show 3 |
‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मध्ये पुन्हा एकदा कपिल शर्मासोबत सुनील ग्रोवर, कीकू शारदा आणि कृष्णा अभिषेक त्यांच्या जोक्स आणि आयकॉनिक पात्रांद्वारे प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहेत. तर जजच्या खुर्चीत अर्चना पूरन सिंह दिसणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये कोणते पाहुणे कलाकार मंडळी येणार याची देखील चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. The Great Indian Kapil Show 3 |
हेही वाचा:
नाशिकमध्ये माजी आमदाराचा शिंदे गटात प्रवेश; ठाकरेंना झटका देत भुजबळांना शह देण्याचा प्रयत्न?

