मुसळधार पावसामुळे टेमघर लवासा मुख्य रस्त्याला गेले तडे
Updated On:

पौड (वार्ताहर) : मुळशीत लवासा ठिकाणी बरेच पर्यटक फिरण्यासाठी येत असतात पावसाचा जोर पाहता मुख्य रस्ते खचले आहेत. टेमघर कडून लवासाच्या दिशेने जाणाऱ्या रस्ता खचला आहे 4 चाकी वाहने जायला धोकादायक रस्ता झाला असून टेमघर येथे रस्ता खचला असल्याने लवासाकडे येणाऱ्या नागरिकांनी प्रवास टाळावा.
पानशेत कडून लवासा कडे येणारा रस्ता खचला असल्याने नागरिकांनी प्रवास टाळावा असे आवाहन मुळशी मावळ प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले, तहसिलदार रणजित भोसले,अप्पर तहसिलदार प्रियांका मिसाळ यांनी केले आहे.





