Rashmika Mandanna : रश्मिकाच्या बहुचर्चित ‘या’ सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचा टीझर आऊट

मुंबई : सध्या अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना स्टारर ‘पुष्पा 2’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. या चित्रपटाने 4 दिवसांत 700 कोटींहून अधिकची कमाई केली आहे. यादरम्यान रश्मिका मंदानाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रश्मिकाच्या बहुचर्चित सस्पेन्स थ्रिलर चित्रपटाचा टीझर समोर आला आहे.
रश्मिका मंदानाचा आगामी सिनेमा ‘द गर्लफ्रेंड’ चा टीझर समोर आला आहे. यात तिच्यासोबत दीक्षित शेट्टी आहेत. चित्रपटाचा टीझर खूपच मनोरंजक आणि सस्पेन्सने भरलेला दिसत आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीची भूमिका साकारत आहे. ‘द गर्लफ्रेंड’ची घोषणा गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये झाली होती. निर्मात्यांनी अद्याप चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही.
रश्मिकाने टीझर केला शेअर
या चित्रपटाचा टीझर शेअर करताना रश्मिकाने लिहिले की, “लास्ट बेबी प्रोजेक्ट तुमच्यासाठी तयार आहे. “मला माहित आहे की आम्ही तुम्हाला खूप वेळ वाट पाहायला लावली पण शेवटी काम झालं आणि टीजर आला असे रश्मिकाने म्हंटले आहे.
येथे पहा टीझर 👇👇
या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास चित्रपटाची कथा राहुल रवींद्रन यांनी लिहिली असून दिग्दर्शनही त्यांनीच केलं आहे. तेलगू व्यतिरिक्त हा चित्रपट हिंदी, मल्याळम, तामिळ आणि कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित होणार आहे.





