Neha Gadre : 15 वर्षांनी पुन्हा एकत्र आली ‘मन उधाण वाऱ्याचे’ची टीम; नेहा गद्रे फोटो शेअर करत म्हणाली…
Neha Gadre : “मन उधाण वाऱ्याचे… १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या आठवणींच्या वाऱ्यावर!” असं म्हणत नेहाने या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही केवळ एक टीव्ही मालिका नव्हती, तर ती आपल्या आयुष्याचा आणि आठवणींचा एक सुंदर भाग बनली होती, अशी भावना तिने व्यक्त केली.

Neha Gadre : काही मालिका संपल्यानंतरही त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनात कायमच्या घर करून राहतात. ‘मन उधाण वाऱ्याचे’ हीदेखील अशीच एक लोकप्रिय मालिका होती. स्टार प्रवाह वाहिनीवर प्रसारित झालेल्या या मालिकेने आपल्या कथानकाने आणि व्यक्तिरेखांनी प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली होती. (Neha Gadre)
२००९ मध्ये सुरू झालेली ही मालिका २०११ मध्ये प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, मालिकेच्या आठवणी आजही ताज्या आहेत. आता तब्बल १५ वर्षांनंतर ‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिकेतील काही कलाकार पुन्हा एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. यानिमित्ताने अभिनेत्री नेहा गद्रे ( Neha Gadre) हिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.( Neha Gadre)
“मन उधाण वाऱ्याचे… १५ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्या आठवणींच्या वाऱ्यावर!” असं म्हणत नेहाने या मालिकेच्या आठवणींना उजाळा दिला. ‘मन उधाण वाऱ्याचे’ ही केवळ एक टीव्ही मालिका नव्हती, तर ती आपल्या आयुष्याचा आणि आठवणींचा एक सुंदर भाग बनली होती, अशी भावना तिने व्यक्त केली.
गेल्या १५ वर्षांत माणसं, ठिकाणं, आयुष्य आणि परिस्थिती बरंच काही बदललं. मात्र, काही आठवणी काळाच्या ओघातही तशाच अबाधित राहतात. त्या सुंदर प्रवासाचा भाग असलेल्या कलाकार आणि सहकाऱ्यांना पुन्हा भेटणं खरोखरच खास होतं, असंही नेहाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ( Neha Gadre)
View this post on Instagram
मालिकेतील काही कलाकार या भेटीसाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्यासाठीही नेहाने खास संदेश लिहिला. “जे आमच्यासोबत सामील होऊ शकले नाहीत, तुमची खूप आठवण आली. आशा आहे की आपण लवकरच पुन्हा एकत्र आनंद साजरा करू” असं तिने म्हटलं. (Neha Gadre)
‘मन उधाण वाऱ्याचे’ मालिका कश्यप परुळेकर यांनी निखिल मोहिते, तर नेहा गद्रे हिने गौरी मोहितेची भूमिका साकारली होती. त्यांच्यासोबत वर्षा उसगावकर, उदय टिकेकर आणि शर्मिष्ठा राऊत यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. प्रसिद्ध अभिनेते-दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘कोठारे व्हिजन’ या संस्थेने या मालिकेची निर्मिती केली होती. (Neha Gadre)
निखिल आणि गौरी यांच्या नात्याभोवती फिरणारं मालिकेचं कथानक, त्यातील व्यक्तिरेखा आणि कौटुंबिक पार्श्वभूमी यामुळे ‘मन उधाण वाऱ्याचे’ला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं.





