रॅपलिंग करीत कोकणकडा केला अवघ्या 45 मिनिटांत सर…

Updated On:
रॅपलिंग करीत कोकणकडा केला अवघ्या 45 मिनिटांत सर…

दिवे – प्रजाकसत्ताक दिनानिमित्त दिवे (ता. पुरंदर) येथील गिर्यारोहक नितीन जाधव व रॉबिन हिंगणेकर यांनी 1800 फूट उंचीचा सह्याद्रीतील कोकणकडा रॅपलिंग करीत 45 मिनिटांत सर करीत मोहिम फत्ते केली. यावेळी सातजणांनी सहभाग घेतला.

दिवे येथील जाधव आणि पुण्यातील हिंगणेकर यांनी यापूर्वी सह्याद्रीतील बऱ्याच मोहिमा एकत्र सर करीत फत्ते केल्या आहेत. प्रजाकसत्ताकदिनी त्यांनी कोकणकडा सर करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार (दि.25) जानेवारीला रात्री तीन वाजता त्यांनी हरिश्‍चंद्र गडावरवरून चढाई करण्यास सुरुवात केली. सकाळी सहा वाजता ते गडावर पोहोचले.

प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर त्यांनी सात वाजता कोकणकडा रॅपलिंगला सुरुवात केली. पहिला टप्पा जवळजवळ चारशे फुटांचा आहे. हा टप्पा पूर्ण ओव्हर हॅंग (लटकून) खाली जाणे असा होता. त्यानंतर दुसरा टप्पा आठशे फुटांचा आहे. तिसरा टप्पा पुन्हा सहाशे फुटांचा आहे. हे सर्व टप्पे त्यांनी 45 मिनिटांत पार केले आहेत.

“वर्षभरात गियारोहणाचे उपक्रम राबवित आहेत. आमच्या सहकाऱ्यांसमवेत ट्रेकींग, गिर्यारोहण यापूर्वी केले आहे. सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यात आज अनेक गिर्यारोहक स्वच्छंद भटकंती करीत विविध गडावर मोहिमेत सहभागी होत असतात. आजचे झालेले रॅपलिंग आमच्या ग्रुपसाठी अविस्मरणीय ठरले आहे. आठशे फूट उंचीच्या सह्याद्रीतील प्रचंड कोकण कड्यावरून हे रॅपलिंग पुढील ध्येयासाठी ऊर्जा देणारे आहे.
– नितीन जाधव, रॉबिन हिंगणेकर, गिर्यारोहक.

त्यानंतर पुढे खडतर प्रवास बेलपाडापर्यंत होता. वाटेवरच मोठ्या दगडांवरून जावे लागते. या कपऱ्यातून वाट अशी नाहीच. दगडांवर पाय ठेवून जिथे वाट दिसेल, तिथे पाय रोवून जावे लागते. अतिशय कष्टदायक वाट चालून जवळजवळ साडेपाच तासांचे पदग्रहण करून रात्री सात वाजता ते बेलपाडा येथे पोहोचले. 

मोहिमेचे आयोजन एस. एल. ऍडव्हेंचर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष लहू उघाडे यांनी केले होते. प्रतीक पाटील, किशोर मोरे, शंकर पाटील, अजय लालवानी, तुषार बोरगे यांनी त्यांना साथ दिली. यावेळी एकूण 15 सदस्यांनी कोकणकड्याचा अठराशे फुटांचा टप्पा रॅपलिंग करीत पार केला आहे. 

आणखी संबंधित बातम्या

Jambut News : विद्यार्थ्यांनी सिंहावलोकन करावे.! माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा

2026-04-21 19:18:45

Jambut News : विद्यार्थ्यांनी सिंहावलोकन करावे.! माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्यात जुन्या आठवणींना उजाळा

राजगडच्या पायथ्याशी विस्मय फाउंडेशनचा 'प्रकाशमान' उपक्रम; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

2025-12-25 17:57:25

राजगडच्या पायथ्याशी विस्मय फाउंडेशनचा 'प्रकाशमान' उपक्रम; दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित

अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे ठरलं!

2025-12-24 08:45:15

अखेर दोन्ही राष्ट्रवादीचे ठरलं!

Baramati : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात

2025-12-05 18:54:38

Baramati : राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; विदेशी दारूचा साठा आणि वाहन ताब्यात

Leopard Rescue : हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद; पाच दिवसांच्या मोहिमेला यश!

2025-12-05 16:31:18

Leopard Rescue : हुलकावणी देणारा बिबट्या अखेर जेरबंद; पाच दिवसांच्या मोहिमेला यश!