मुंबई – पायरसी ही चित्रपटांच्या पाचवीला पुजलेली आहे असे म्हणतात. सिनेमा रिलीज झाला रे झाला की त्या चित्रपटाची पायरसी कॉपी बाजारात येते. आता तर बाजारातही जाण्याची गरज भासत नाही मोबाईलवर एका लिंकवर क्लीक केलं की नवीन चित्रपट डाउनलोड होतो. फ्रीमध्ये चित्रपट मिळत असल्यासामुळे अनेक जण तो डाउनलोड देखील करतात. परंतु ही पायरसी नेमकी कशी होती हे दाखवणारी एक वेब सिरीज सोनी लाईव्हवर प्रदर्शित करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पायरसी आहे एक मोठा व्यवसाय बनला आहे. अशाच एका पायरसी करणाऱ्या तामिळ रोकर्स या वेब साईटने या विश्वात मोठा धुमाकूळ घातला होता. याच साईटच्या प्रवासावर आधारित ‘द तामिळरॉकर्स’ ही वेबसीरिज नुकतीच सोनी लीव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाली आहे.या सिरीजमध्ये पायरसीचे नेटवर्क उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.त्यामुळे या सिरींजबाबत तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असल्याचे दिसून येते.
View this post on Instagram
पायरसी नेमकी कशी होते ? त्याचे विदेशात कनेक्शन आहे? हा नेमका व्यवसाय कसा चालतो याबाबतच्या अनेक गोष्टींचा उलगडा करणारी ही सिरीज आहे. या वेबसीरिजमध्ये अर्जुन विजय, वाणी भोजन, इस्वर्य मेनन हे कलाकार मुख्य भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात. सध्या या सिरींजचा पहिला सीजन प्रदर्शित झालं आहे. पायरसी विश्व दाखवणारी ही सिरीज सध्या प्रचंड चर्चेचा विषय बनली आहे.