नवी दिल्ली – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अनिल देशमुख यांची जप्त केलेली संपत्ती परत करण्याचे आदेश न्यायालयाने ईडीला दिले आहेत. ईडीने मनी लॉंड्रिंग प्रकरणी देशमुख यांना अटक करत घर आणि त्यांच्या कार्यालयावर छापा टाकत 11 मालमत्ता जप्त केल्या होत्या. यामध्ये अनिल देशमुख यांचे पुत्र योगेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी शीतल देशमुख यांच्या वैयक्तिक 11 मालमत्ता जप्त केल्या होत्या. या प्रकरणी अनिल देशमुख यांच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर सुनावणी करताना न्यायालयाने ईडीला फटाकरत देशमुख यांच्या कुटुंबाला दिलासा दिला. न्यायालयाने ईडीला देशमुख यांच्या जप्त केलेल्या सर्व 11 मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भातील माहिती अनिल देशमुख यांचे वकील विपुल अग्रवाल यांनी दिली.