पूना नाईट कॉलेजची यशाची परंपरा कायम

बारावी वाणिज्य शाखेचा निकाल 72 टक्‍के

पुणे – सरस्वती मंदिर संस्थेचे पूना नाईट हायस्कूल व श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ज्युनिअर कॉलेजचा इयत्ता बारावी वाणिज्य शाखेचा निकाल 72 टक्‍के इतका लागला आहे.

दिवसा मिळेल ते काबाडकष्ट करून रात्रीच्या वेळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यार्थ्यांनी गेली दहा वर्षे यशाची परंपरा कायम राखली आहे. बारावी वाणिज्य शाखेच्या परीक्षेला एकूण 114 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 82 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नवरत गौरव मधुकर या विद्यार्थ्याने 650 पैकी 502 गुण घेत 77.23 टक्‍के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. एकूण 19 विद्यार्थिनीनी परीक्षा दिली होती. त्यापैकी 18 मुली उत्तीर्ण झाल्या. रेखा जर्नादन सिरसट यांनी 70.61 टक्‍के गुण संपादन करीत मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्यांनी दहावीतही प्रथम क्रमांक पटकाविला होता. सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष प्रा. विनायक आंबेकर, प्राचार्य अविनाश ताकवले, चिटणीस सुधीर चौधरी यांनी अभिनंदन केले.

नाईट कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थी
1) नवरत मधुकर : 77.23 टक्‍के
2) प्रथमेश मोरे : 73.69 टक्‍के
3) सागर लोंढे : 73.38 टक्‍के

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.