पुणे – पहाटेच्या शपथविधीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने राज्यात राजकीय वातावरण तापले असतानाच; फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर ोलण्यास विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी नकार दिला. “फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीद्दल काहीही बोलायचे नाही. विषय संपला. दुसरे काही विषय असतील तर बोला. पुन्हा पुन्हा तेच उगाळून काढू नका,’ असे सांगत पवार यांनी या विषयावर बोलणे टाळले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात “राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच पहाटेचा शपथविधी झाला होता,’ असे वक्तव्य केले. त्यानंतर राज्यात एकच राजकीय वादळ उठले होते. तर, कॉंग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही त्यांच्या या वक्तव्यांच्या समाचार घेत “फडणवीस आधीच का हे बोलले नाहीत,?’ असा सवाल करत भाजप पोटनिवडणुकांसाठी अशी व्यक्तव्ये करत असल्याची टीका केली होती. त्यानंतर शरद पवार यांनीही हा दावा खोडून काढला होता. मात्र, मंगळवारी फडणवीस यांनी पुन्हा आपल्या दाव्याचे समर्थन करत “शपथविधीबाबत अर्धेच बोललो असून योग्य वेळ आल्यावर राहिलेले बोलेल’ असे सांगितले होते. तर या वक्तव्यानंतर अजित पवार यांनी अद्याप प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, गुरुवारी पुण्यात एका कार्यक्रमासाठी पवार यांना माध्यमांनी गाठत प्रतिक्रिया विचारली. त्यावर ोलण्यास पवार यांनी साफ नकार दिला. ते म्हणाले, “मला बाकीच्यांद्दल काहीही ोलायचे नाही. फडणवीस यांच्यासोबत घेतलेल्या शपथविधीद्दल मला काहीही बोलायचे नाही. मी याआधी यावर बोललेलो आहे. त्यामुळे मी माझ्या त्याच मतावर ठाम राहणार आहे. तुम्ही पुन्हा पुन्हा विचारण्याचा प्रयत्न केला तरी माझ्याकडून हेच उत्तर मिळणार.’ असे बोलत पवार यांनी भाष्य टाळले.