Jayanti Trailer 2 : ग्रामीण विद्यार्थिनीच्या संघर्षाची कहाणी! जयंती 2 चा जबरदस्त टीझर प्रदर्शित
Jayanti Trailer 2 : ग्रामीण भागातील एका विद्यार्थिनीला शिक्षण घेताना सहन करावा लागणारा भेदभाव आणि त्यातून उभे राहणारे प्रश्न याभोवती चित्रपटाची कथा फिरणार असल्याचे संकेत टीझरमध्ये देण्यात आले आहेत.

Jayanti Trailer 2 : मराठी चित्रपटसृष्टीत काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ या चित्रपटाने सामाजिक आशयामुळे प्रेक्षकांची मने जिंकली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा तरुणांवर होणारा सकारात्मक प्रभाव प्रभावीपणे मांडणाऱ्या या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळाला होता. (Jayanti Trailer 2)
आता या यशस्वी चित्रपटाचा पुढील भाग ‘जयंती २’ (Jayanti Trailer 2 ) येत्या ११ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, नुकताच त्याचा दमदार टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
टीझरमधून ‘जयंती २’ हा चित्रपट सध्याच्या शिक्षण व्यवस्थेशी निगडित गंभीर विषय हाताळणार असल्याचे स्पष्ट होते. ग्रामीण भागातील एका विद्यार्थिनीला शिक्षण घेताना सहन करावा लागणारा भेदभाव आणि त्यातून उभे राहणारे प्रश्न याभोवती चित्रपटाची कथा फिरणार असल्याचे संकेत टीझरमध्ये देण्यात आले आहेत. (Jayanti Trailer 2)
चित्रपटात संत्या या लोकप्रिय पात्राच्या भूमिकेत पुन्हा एकदा अभिनेता ऋतुराज वानखेडे झळकणार आहे. त्याच्यासोबत पायल जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाष यांसारखी दमदार कलाकारांची फळीही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे.
‘जयंती २’ची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली असून, चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शनाची धुरा शैलेश बळीराम नरवाडे यांनी सांभाळली आहे. संजीवकुमार हिल्ली यांनी छायांकन केले असून फैसल महाडिक यांनी संकलनाची जबाबदारी पार पाडली आहे. (Jayanti Trailer 2)
२०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जयंती’ने वेगळ्या विषयामुळे आणि प्रभावी मांडणीमुळे प्रेक्षकांसह समीक्षकांचेही लक्ष वेधले होते. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने यश मिळवले होते. आता शिक्षण क्षेत्रातील वास्तव आणि सामाजिक विषमता यांसारख्या संवेदनशील विषयांवर भाष्य करणारा ‘जयंती २’ही तितकाच प्रभावी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नुकताच प्रदर्शित झालेला टीझर भावनिक, विचारप्रवर्तक आणि प्रभावी वाटत असून, त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. ११ सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Jayanti Trailer 2)





