शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, पण काही वेळातच बदलले चित्र

Share Market | भारतीय शेअर मार्केटने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी उच्चांकावर झेप घेतली. सुरुवातीच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सने 80,481 अंकांवर तर निफ्टीने 24,459 अंकांच्या उच्चांकावर मुसंडली मारली. मात्र, व्यवहाराच्या काही मिनिटांत पुन्हा लाल रंगात घसरण झाली. सध्या सेन्सेक्स 700 हून अधिक अंकांच्या घसरणीसह 79,550 च्या पातळीवर व्यवहार करत आहे.
त्याचवेळी निफ्टीही 200 हून अधिक अंकांनी घसरला आहे. तो 24,200 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. आज मेटल, ऑटो आणि आयटी शेअर्समध्ये घसरण दिसून येत आहे. याआधी काल म्हणजेच मंगळवारीही बाजाराने उच्चांक गाठला होता. तर आज बुधवारी सुरुवातीच्या सत्रात ऑटो आणि पॉवर शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी नोंदवली गेली त्याचवेळी, बँकिंग आणि आयटी समभागांमध्ये घसरण दिसून येत आहे.
सेन्सेक्सवर 30 शेअर्स लिस्ट आहेत, त्यापैकी 19 शेअर्स तेजीत आहेत. मारुती, अदानी पोर्ट्स आणि नेस्लेमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. दुसरीकडे, सर्वाधिक घसरण झालेल्या 5 समभागांव्यतिरिक्त, ज्या समभागांमध्ये मोठी घसरण झाली त्यांची नोंद झाली. त्यापैकी एचसीएल टेक शेअर 3%, टाटा स्टील शेअर 2%, टाटा मोटर्स शेअर 1.80%, अल्ट्राटेक सिमेंट शेअर 1.50% आणि मुकेश अंबानीचा रिलायन्स शेअर 1.50% च्या आसपास ट्रेडिंग करत होता.
सेन्सेक्सप्रमाणेच निफ्टीमध्येही मोठी घसरण झाली. बाजार उघडताच निफ्टीवरील मारुती सुझुकी, ग्रासिम इंडस्ट्रीज, आयशर मोटर्स, अदानी पोर्ट्स आणि ओएनजीसी वाढीसह व्यवहार करत होते, तर महिंद्रा अँड महिंद्रा, SBI, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक आणि इंडसइंड बँक हे स्टॉकमध्ये घसरण दिसून आली.
हेही वाचा:
उन्नावमध्ये भीषण अपघात, डबल डेकर बस दुधाच्या कंटेनरला धडकली 18 जणांचा मृत्यू तर 30 हून अधिक जण जखमी





