चिंबळी -संपूर्ण राज्य अनलॉक झाले अन् पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडीची समस्याने पुन्हा डोके वर काढले असल्याने रुंदीकरणाचे राज्यकर्त्यांचे आश्वासन वायफळ ठरत असल्याचे स्थानिकांसह प्रवाशांचे म्हणणे आहे. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम, वाहनांची वाढलेली संख्या, अवैध प्रवासी वाहतुकीची वाढलेली वर्दळ, एमआयडीसीच्या मोठ्या गाड्या, बेशिस्त वाहनचालक, आणि शहरातील अरुंद चौक ,रस्त्यावरील खड्डे, अशा विविध कारणांमुळे प्रचंड वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांनाच सहन करावा लागत आहे. मंगळवारी (दि. 17) दुपारी चाकण येथे वाहतूक कोंडीमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे प्रवासी घायकुतीला आले होते. चाकणमधील तळेगाव, आंबेठाण, माणिक आदी चौकांत येथे वाहतूक पोलिसांकडून उपाययोजना करूनही वाहतुकीचा अक्षरशः बोऱ्या उडाला होता.